नांदेड : मराठवाडा शिक्षक संघ, नांदेड जिल्ह्याच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी “शिक्षण: प्रश्न अनेक उत्तर एक” या श्री. ज्ञानोबा वरवट्टे यांच्या गौरव ग्रंथावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३५ वाजता नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज, नांदेड येथे पार पडणार असून शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, शिक्षक व जाणकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या परिसंवादासाठी प्रा. अजित अभ्यंकर (पुणे) भाष्यकार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत, तर प्रा. अशोक सिद्धेवाड (नांदेड) शिक्षणाच्या आर्थिक पैलूंवर सखोल अर्थ विश्लेषण करतील. तसेच राजकीय विश्लेषक म्हणून शिक्षण क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या धोरणांवर विचार मांडले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सूर्यकांत विश्वासराव, अध्यक्ष – मराठवाडा शिक्षक संघ कार्यभार स्वीकारतील. प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे आणि प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानोबा वरवट्टे आणि राजकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवादाची सांगता होईल.
शिक्षण क्षेत्रात नवे विचार, नवी दृष्टी आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यासाठी हा परिसंवाद महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व हितचिंतकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment