भाद्रपद पौर्णिमेनिमित्त दाभड येथील महाविहारात धम्मदेसना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 4 September 2025

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त दाभड येथील महाविहारात धम्मदेसना

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त दाभड येथील महाविहारात धम्मदेसना 


नांदेड : भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था, मुळावा ता. उमरखेड (जि. यवतमाळ) आणि शाखा महाविहार बावरी नगर, दाभड यांच्या संयुक्त विद्यमाने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


हा कार्यक्रम रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. महाविहार बावरी नगर, दाभड (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथे होणार आहे.


प्रत्येक पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे स्मरण करून बौद्ध उपासक-उपासिका अष्टशील पाळत, ध्यान-भावना करून धम्मानुसार आचरण करतात. याच परंपरेनुसार यावर्षीही पौर्णिमेचे औचित्य साधून हा कार्यक्रम होत आहे.


धम्मदेसना करण्यासाठी श्रध्येय भिक्खू डॉ. प्रा. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू दयानंद महाथेरो, भिक्खू अस्सजी थेरो, भिक्खू बुद्धभूषण, भन्ते संघपाल तसेच भिक्खुणी चारुशीला व भिक्खूसंघ उपस्थित राहणार आहेत.


संयोजक म्हणून डॉ. एस. पी. गायकवाड यांनी सर्व बौद्ध बांधवांना शुभ्र वस्त्र परिधान करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages