नांदेड, दि. २ सप्टेंबर :
नांदेड जिल्ह्यात जनवादी लेखक संघाची जिल्हास्तरीय शाखा स्थापन झाली असून अध्यक्षपदी प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी प्रफुल्ल कऊडकर, कार्याध्यक्षपदी कवी सुभाष बोड्डेवार तर उपाध्यक्षपदी अरुण दगडू यांची सर्वानुमते निवड झाली.
समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखक, कवी व बुद्धिजीवींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रगतिशील विचारवंत प्रा. डॉ. उदय नारकर (कोल्हापूर) व जनवादी चळवळीचे नेते कॉ. विजय गाभने प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनातून जनवादी विचारांची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात जनवादी लेखक संघाच्या स्थापनेमुळे पुरोगामी साहित्य चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment