जाती मोजायच्या की गाडायच्या? — मधु कांबळे लिखित पुस्तकाचे दादर येथे प्रकाशन
मुंबई : “जाती मोजायच्या की गाडायच्या?” या ज्वलंत विषयावर लिहिलेल्या ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन व चर्चासत्र रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर, शाहू सभागृह, तिसरा मजला येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत लक्ष्मीकांत देशमुख असतील. तर कार्याध्यक्ष म्हणून भरत शेळके ,कार्याध्यक्ष, सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्र, हे उपस्थित राहणार आहेत.
चर्चेत ज्ञानेश महाराव (संपादक व ज्येष्ठ विचारवंत), प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे (अध्यक्ष, दलित महासंघ व विचारवंत), अर्जुन डांगळे (ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत) तसेच गौतमीपुत्र कांबळे (अध्यक्ष, सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्र) सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्र व सेक्युलर आर्ट मुव्हमेंट, महाराष्ट्र यांच्या संयोजनाने आयोजित केला असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment