शिक्षणक्रांती व सामाजिक ऐक्यासाठी ‘सकल अनुसूचित जाती परिषद’ नांदेडमध्ये
नांदेड,दि.२ : समाजात शिक्षणक्रांती घडवून आणण्यासाठी आणि मातंग, चर्मकार, बौध्द तसेच सकल अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ जातींमध्ये बंधुत्व, भाईचारा आणि सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने “सकल अनुसूचित जाती शिक्षणक्रांती परिषद व राज्य अभियान” चे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे.
हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरवादी मिशन, डॉ. आंबेडकर चौक, सिडको (लातूर कॉर्नर), नांदेड येथे होणार आहे.
या परिषदेचे आर. के. सिंग हे अध्यक्षस्थान भूषविणार असून, उद्घाटन अविनाश कुमार (IPS), जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या हस्ते होईल.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुल कर्डीले (IAS), जिल्हाधिकारी नांदेड, प्रा. डॉ. मिलिंद आव्हाड, प्रा. डॉ. अनंत राऊत, ॲड. शिवराज कोळीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष उपस्थितीमध्ये अरविंद रायचोले (DYSP), प्रा. विनोद काळे, मा. शिवानंद मिनगिरे, मा. खंडू दर्शने (PSI), इंजि. पिरेश पडघणे, प्राचार्य सुरेश घुले, प्रा. डॉ. भास्कर दवणे यांचा समावेश आहे.
या अभियानांतर्गत शिक्षणक्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक रणनिती, UPSC/MPSC तसेच इतर उच्च पदांच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी सत्कार यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच समाजात बंधुत्व व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी मान्यवरांचे प्रेरणादायी विचार मांडले जातील.
दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) यांनी समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment