मुंबईच्या आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 30 August 2025

मुंबईच्या आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन


मुंबई:-  शुक्रवारी जास्त पाऊस पडल्याने आझाद मैदानात चिखलाचे साम्राज्य झाले होते. शनिवारी त्या चिखलात बसून काहींनी आंदोलन केले. चिखलावर उपाय म्हणून खडी टाकण्यात आली. मात्र,आणलेली ही खडी टाकण्यासाठी  आयोजकांनी विरोध केला. महापालिकेने वेळेवर खडी टाकणे गरजेचे होते, असे आंदोलकांचे म्हणणे होते. त्यामुळे पंधरा वीस मिनिटे खडी टाकण्यास आंदोलकांनी विरोध केला. दरम्यान, व्यासपीठाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वीरेंद्र पवार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर खडी आणण्यात आल्याची माहिती अरुण काकडे यांनी दिली.

      आझाद मैदानात आंदोलकांना पहिल्या दिवशी जोरदार पावसाचा सामना करावा लागला होता.दुसऱ्या दिवशी शनिवारी मात्र सकाळी पावसाने उसंत घेतली. दुपारपर्यंत काही काळ कडक ऊन पडले होते. दुपारी ४ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारी ऊन जास्त असल्याने आंदोलकांनी उन्हापासून बचावासाठी डोक्यावर छत्र्या घेतल्या होत्या. तर, संध्याकाळी या छत्र्यांचा वापर पावसापासून बचावासाठी झाला.

No comments:

Post a Comment

Pages