आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांंना प्रशस्तिपत्र
किनवट दि.२५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज(दि.२५) गुणवंत विद्यार्थ्यांंना प्रशस्तिपत्र व स्वस्त धान्य दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर व अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप आमदार केराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची पंडित दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा मोठ्या प्रमाणात गरिबांना लाभदायी ठरत आहे.परंतु, धान्य वाटप करते वेळी स्वस्तधान्य दुकानात मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकांची गर्दी होते. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानदार व त्यांच्या सहकार्यांना कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. याची पर्वा न करता स्वस्तधान्य दुकानदार आपले कर्तव्य सतत बजावत आहे. हे लक्षात आल्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे बाळकृष्ण कदम यांच्या वतीने दुकानदारांना रोग प्रतिकारशक्ती वाढवणार्या अर्सनिक अल्बम, मास्क, सॅनिटायझर चे वाटप केले.
सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनीवास नेम्मानीवार यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, गोवर्धन मुंडे, मारोती भरकड, युवा मोर्चाचे उमाकांत कराळे, नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार , प्रकाश कुडमेथे, पत्रकार मधुकर अन्नेलवार, स्विय सहाय्यक निळकंठ कातले, दत्ता भिसे, राजेेंद्र मेश्राम, आदींची उपस्थिती होती.
कोरोणाच्या काळात जीव धोक्यात घालून दुकानदार हे नागरीकांना स्वस्त धान्याचे वाटप करत आहेत. याची सूचना भा. ज. यु. मो. चे बाळकृष्ण कदम यांना मिळताच त्यांनी उपयुक्त साहीत्यांचे वाटप केले. त्यांनी या समाजपयोगी कृतीने सहानुभूतीपूर्वक विचार केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
- अँँड. मिलीद सर्पे,
सल्लागार, रास्त भाव दुकानदार संघटना.
आपल्या लोकप्रिय News Portal वरुन बातमी प्रसिद्ध केल्या बदल खूपखूप धन्यवाद. आपल्या सहकार्याने असेच कार्य करण्याची प्रेरणा मिळते !
ReplyDelete