प्रबोधनकार शाहीर माधव विठ्ठलराव वाढवे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. आयु. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 27 September 2020

प्रबोधनकार शाहीर माधव विठ्ठलराव वाढवे यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान.. आयु. महेंद्र नरवाडे



   
   शाहीर माधव विठ्ठलराव वाढवे यांचा जन्म १०जुलै १९७३ साली हदगाव तालुक्यातील रुई येथे झाला. सध्या ते भीमटेकडी, हदगाव जि.नांदेड येथे राहतात.त्यांचे शिक्षण दहावी पर्यंत झाले . व्यवसायाने मॅक्यानिक असुन ते दुचाकी व तिनचाकी वाहने दुरुस्ती करतात.गावातील पंचशील गायण पार्टीत त्यांचे कुटुंबातील त्यांचे गायक कलावंत आजोबा धनबाजी व काका साळबाजी वाढवे,रामानंद वाढवे  बुद्ध भीम गीते गात असत त्यांच्या सहवासात राहून कार्यक्रम करण्याची कला अवगत झाली . त्यांच्या प्रभावाने शाहीर माधव वाढवे यांनी ही गायन कला लहान पणापासूनच  जोपासली आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून या गायण क्षेत्रात आहेत. पहाडी आवाज व मनोजराजा गोसावी व सुर्यकांत यांच्या भारदस्त  शेरोशायरीने रसिकांवर अधिराज्य गाजवण्याचे कसब   त्यांच्यात आहे. त्यांच्या प्रभावी गीत गायणामुळे रसिक मंत्रमुग्ध होतात. त्यांच्या संचात  संगीत साथ देण्यासाठी तबलावादक सिध्दार्थ कवडे, ढोलकीवादक अशोक इंगोले, बँजो वादक राजे बलखंडे किंवा अशोक बनसोडे या दोघापैकी अधुन-मधुन असतात व हार्मोनियम स्वत: माधव वाढवे वाजवतात.

    महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ग्रामीण तसेच शहरी भागात  जयंती असो की धम्मपरिषद असो किंवा  लग्नसमारंभ असो की  वयक्तीक आयोजन असो त्याठिकाणी आपल्या संचासह जाऊन बुद्ध ,भीम,फुले,शाहु,रमाई भीमाईचा विचार पेरण्यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम केले.महाराष्ट्राबाहेर ही दोन-तीन राज्यात त्यांच्या संचाने कार्यक्रम सादर करुन नाव लौकीक मिळविला आहे.समाजप्रबोधन कार्यात सदैव तत्पर असलेले माधव वाढवे यांनी अनेक गीतं लिहिली व प्रभावीपणे गायलीआहेत.शिवाय इतर कवी गायकांची गीतं 2004मध्ये लाइव्ह कार्यक्रम व्हीडीओ  रेकार्डींग झाले. रमाई म्युझिक कंपनी साप्ती ता.हदगाव जि.नांदेड. व कुणाल म्युझिक कंपनी-तर्फे
१.भीम प्रबोधन -लढा क्रांतीचा भाग १ व भाग २,
२. क्रांतीचा निखारा.
३.भाग्य रमाईचं.
४.भीमक्रांतीची मशाल.
५.वादळ क्रांतीचं.
६.शंभर नंबरी  भीमराव माझ्या गळ्यातलं सोनं.
व शाहीर माधव वाढवे लिखित गीतांचे कॅसेट-
७.भीमाची रमाई
८.बौद्ध धम्म परिषद लाईव्ह कार्यक्रम, महागाव .
युट्युबवर ह्या व्हिडीओ क्यासेट मधील गाणी समाज प्रबोधनासाठी उपलब्ध आहेत.

मनपसंत गीते-
१.ओ मायबापा भीमा,या शुभमंगल दिना
ही तुम्हा वंदना,ही तुम्हा वंदना.
२.आठवावा भीमाने अहो, दिलेला धडा
न्याय हक्कासाठी करा, रक्ताचा सडा
भीमवीरानों उठा,लढविण्या लढा
नाही तर भरावा चुडा.
३.एकदा वदले भीम आम्हाला
शिकलेले काही गद्दार होतील.
४.ती जन्मभूमी भाग्यशाली,महू त्यांचं गाव
बाप भीमराव माझा,बाप भीमराव.
५.नव कोटींची आई,धन्य भीमाची रमाई
भीमाची रमाई ,धन्य भीमाची रमाई.

पुरस्कार-
दै.सम्राट ता.बीलोली यांच्या तर्फे वामनदादा कर्डक प्रबोधन पुरस्कार  प्राप्त.
संदेश-
   प्रबोधनकार शाहीर माधव वाढवे म्हणतात  समाजाचा गाडा पुढे न्यावयाचा असेल तर तरुणांनी पुढे यायला पाहिजे.आंबेडकरी बांधवांना ते आवाहन करतात की सत्यासाठी जीवन संघर्ष करा.रक्त सांडलं तरी चालेल पण रणांगणी लढलं पाहिजे असा संदेश देतात.त्यांच्या प्रभावी प्रबोधनकारी वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! धन्यवाद.!

  - आयु.महेंद्र नरवाडे
किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०

1 comment:

  1. मामा तुमच्या कार्याला मनाचा जय भीम 🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

Pages