अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन पिकाचे तत्काळ पंचनामे करा ... आमदार भीमराव केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 1 October 2020

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन पिकाचे तत्काळ पंचनामे करा ... आमदार भीमराव केराम

 


किनवट,दि.१: माहूर व किनवट तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन व कापूस पिकावर दि.१५ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये संततधार पावसामुळे निसर्गाची अवकृपा झाली आणि काढणीला आलेल्या सोयाबीन व वेचणीला आलेले कापूस पाणी ओलाव्यामुळे जागेवरच खराब झाले. शेतकऱ्यावर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्ती चे तातडीने सर्वेक्षण होणे गरजेचे होते, परंतु विद्यमान सरकारचे निष्क्रिय धोरण आणि बेजबाबदार नोकरशाहीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधे पंचनामे करण्याचेही सौजन्य दाखविलेले नाही.शेतकऱ्यावर ओढवलेल्या या प्रसंगात नेहमीप्रमाणे आमदार भीमराव केराम त्यांच्या मदतीला धावून आले असून बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे पत्र माहूर आणि किनवट तहसीलदारांना बजावले आहे.

    नेहमी अस्मानी सुलतानी संकटाचा बळी पडलेल्या शेतकऱ्याचा शेती हा व्यवसाय सध्या बेभरवशाचा झालेला आहे. घरातील पैका पैका मातीत टाकून त्याला घामाचा कस देणाऱ्या शेतकऱ्याला नैसर्गिक प्रकोप ही नित्याचीच बाब बनली आहे.मागील आठवडा भरपासून परतीच्या पावसाने जोरदार झड लावली होती.त्यात किनवट व माहूर तालुक्यातील विशेषतः बोधडी परिसरातील येंदा,पेंदा,भुलजा,बोधडी (खु.)शिवारातील कापूस,सोयाबिन पिकांसह उसाचे पीक ही जमीन दोस्त झाले आहे.या पार्श्भूमीवर महसूल प्रशासनाने स्व्यास्फुर्तीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करणे गरजेचे होते.जेणे करून शेतकरयांना तुटपुंजे का असेना परंतु आर्थिक लाभ मिळाले असते.मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे सोजन्य दाखवले नाही.या प्रसंगात नेहमीप्रमाणे आमदार भीमराव केराम हे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा बरोबर सानुग्रह अनुदान मंजूर करण्या साठी पंचनामे करण्या विषयीचे पत्र माहूर कीनवट चे तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.या मुळे बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन निश्चितच त्यांना आर्थिक लाभ मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages