उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार,खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 1 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार,खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या.

- नांदेड शहरातील आंबेडकरवादी युवकांचे राष्ट्रपतीना निवेदन.


नांदेड दि ३०. उत्तर प्रदेशातील हाथरस ( चंदपा )येथे 19 वर्षीय युवती वर सामूहिक लैंगिक अत्याचार, खुन प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी तसेच उत्तर प्रदेशातील राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. पीडित कुटुंबियांना प्रथम श्रेणीची नौकरी देण्यात यावी.  संबंधित खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा , केंद्र सरकार कडून एक करोड मुआवाजा देण्यात यावा , यासह अन्य मागण्यांच्या अनुषंगाने नांदेड शहरातील आंबेडकरवादी  तरुणांनी राष्ट्रपतीना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नांदेड येथे निवेदन दिले.


उत्तर प्रदेशातील मानवी अधिकाराचे उल्लंघन ,स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, खून, दरोडा , लुटमार, राजरोसपणे होत असून जंगलराज-गुंडाराज कडे वाटचाल होत आहे विचारवंत, पत्रकार, यांची राजकीय सूडबुद्धीने अटक होत आहे रासुका व राष्ट्रद्रोहाचे खोटे गुन्हाचा सर्रास वापर होत आहे 


ह्या पाशवी जात्यंध, धर्मांध हिटलर-मुसोलिनी मनुवादी राजवाटीचा कटोर शब्दात निषेध करून उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आग्रही मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. 


यावेळीं प्रा.राजू सोनसळे,ऍड यशोनिल मोगले, अतिष ढगे, विशाल एडके सचिन भावे, भीमराव रामजी, सचिन कदम,भूषण शेळके,कुणाल भुजबळ, राहुल घोडजकर, शुक्लोधन गायकवाड, उमेश राजभोज, अभय सोनकांबळे,रवी मस्के, शैलेश वावळे, नागेश दुधमल, नितीन सोनसळे, रितेश गुळवे, देवाल लोकडे, शशी पाईकरव, राजू वावळे, साई पाटील, ऋषभ महादळे आशिष भुक्तरे, शिदू गायकवाड, संतोष ढवळे, आदींची उपस्थिती होता.

No comments:

Post a Comment

Pages