कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेबाबतच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी आज मासूचे कोल्हापूर विभाग अध्यक्ष ओंकार कोळेकर, प्रतीक नेसरकर व इतर सहकाऱ्यांनी कुलगुरू डॉ.श्री.शिर्के आणि परीक्षा संचालक श्री.गजानन पळसे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची आग्रहाची मागणी केली यावर विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रॉक्टरिंग होणार नाही याची खात्री दिली,जे विद्यार्थी चूकून ऑफलाईन परीक्षेसाठी गेले होते त्यांच्यासाठी पून्हा ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी परिपत्रक जारी केले. तसेच संभावित अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणींना सामोरे जावे लागेल याची शक्यता बघता परीक्षा काहि काळ पुढे सुद्धा ढकलल्या.
No comments:
Post a Comment