किनवट/माहूर: राज्यातील शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १० हजार कोटीचे पॅकेज देण्याचा घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आहे. वेळ प्रसंगी सर्व सामान्य जनतेसाठी सरकार तिजोरी रिकामी करण्यास हि मागेपुढे पाहणार नाही. दिवाळीपूर्वीच हि मदत थेट मिळणार शेतकरी आणि पुरग्रस्ताना दिली जाणार आहे . अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांनी दिली. .
परतीच्या पावसाने राज्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले असून सगळीकडे पावसाने हाहाकार उडविला आहे . राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सोलापूर सह इतर भागाचा दौरा करून पाहणी केली आणि राज्यातील गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला आणि जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या पुनर्रउभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने १० हजार कोटीचे पॅकेज देणार असून हा खरंच खूप महत्वपूर्ण निर्णय असून सरकार शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी सदैव आहे हेच यामधून दिसून येते असे खासदार हेमंत पाटील म्हणाले . अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्व सामान्य माणूस पुरता खचून गेला होता त्या सर्व सामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे असेही ते म्हणाले . वेळप्रसंगी सरकार सर्व सामान्य जनतेच्या मदतीसाठी राज्याची तिजोरी सुद्धा रिकामी करायला मागेपुढे पाहणार नाही, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार खऱ्या अर्थाने शेतकरी हित जोपासून कल्याणकारी असल्याचेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.
No comments:
Post a Comment