मुंबई ; राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीग्रस्त नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी
राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल,असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महाविकास आघाडीने आज आढावा बैठक आयोजित केली होती.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.
या बैठकीनंतर थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झालेले नुकसान खूप मोठे असून भरीव मदत मिळावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…
शेती,फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत...
एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.
अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे.
या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे
दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल
पैशाची ओढाताण आहे,पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे
जिरायत,बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे
फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल..
आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार,परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.
No comments:
Post a Comment