धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ उद्या मुख्य कार्यक्रम.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 October 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ उद्या मुख्य कार्यक्रम..

 



किनवट,दि.२४ :भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा किनवट च्या वतीने रविवारी(दि.२५)६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे.किनवट व गोकुंदा परिसरात प्रत्येक वार्ड व नगर मध्ये सकाळी ठिक ७:३०वाजता धम्मध्वजारोहण    करावे,असे आवाहन भारतीय बौध्द महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, गोकुंदा येथे सकाळी ठिक ८:३०वाजता धम्मध्वजारोहण व वंदना घेण्यात येईल. किनवट येथील मुख्य कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ठिक ९:३०वाजता होणार आहे. तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण  होईल .याप्रसंगी संस्कार विभागाच्या वतीने वंदनाही घेण्यात येणार आहे .भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटचे पदाधिकारी व आपापल्या नगरातील पदाधिकारी ,बौद्ध उपासक- उपासिका यांनी शारीरिक अंतर ठेवून व शासनाचे नियमाचे पालन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन बौध्द महासभेचे तालुका सचिव आयु.महेंद्र नरवाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages