मुंबई -नांदेड विशेष रेल्वे किनवट पर्यंत धावणार ; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 13 October 2020

मुंबई -नांदेड विशेष रेल्वे किनवट पर्यंत धावणार ; खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

 


किनवट/माहूर: प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड -मुंबई-नांदेड विशेष एक्सप्रेस  11 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली परंतु या रेल्वे ला किनवट पर्यंत वाढवून द्यावे अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी दक्षिण मध्ये रेल्वे विभागाकडे केली होती या मागणीला यश आले असून ही विशेष एक्सप्रेस आता किनवट पर्यंत धावणार आहे.

               कोरोनाच्या काळात देशाची लाईफ लाईन  रेल्वे सेवा ठप्प झाली होती.मागील सहा महिन्यांपासून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते. आता पूर्वपदावर येत असताना   इतर दळणवळणाच्या सुविधेसोबतच रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी होत असताना प्रत्येक विभागातून मागणी लक्षात घेता महत्वाच्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यामध्ये नांदेड दक्षिण मध्ये रेल्वे विभागातून विशेष  एक्सप्रेस गाडी सुरू करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मध्ये दक्षिण  मध्य  रेल्वे  सिकंदराबाद यांच्याकडे मागणी  केली होती. त्यावर कारवाई करून विशेष रेल्वे ११ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली या गाडी मध्ये केवळ आरक्षित प्रवाशांनाचा प्रवेश असेल असे रेल्वे विभागाने सांगितले आहे. नांदेड पर्यंत रेल्वे  धावत होती.  त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेला याचा फायदा होत नव्हता.मतदार संघातील लोकांना पण याचा  फायदा व्हावा यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार करून सुरू करण्यात येणारी विशेष  एक्सप्रेस किनवट पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली होती त्याची रेल्वे विभागाने  दखल घेऊन विशेष  एक्सप्रेस किनवट पर्यंत धावणार आहे .खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे किनवट,माहूर,मांडवी, यासह जवळपासच्या जनतेची  दळणवळणाची सोय झाल्याने जनतेने आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages