जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिकच्या वतीने निवेदन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 October 2020

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिकच्या वतीने निवेदन.

 




नाशिक विभागातील जवळपास ३०२ शाळा ह्या १० ते १५ विद्यार्थी पटसंख्या असुनही बंद करण्याचा निर्णयाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिकने निवेदन दिले आहे. आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार एका वर्गात १० विद्यार्थी असतात, तरिही १० ते १५ विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करत आहे, तसेच हा निर्णय शिक्षकांना बेरोजगार करणारा व विद्यार्थ्यांना ३ किमी पायपिट करायला लावणारा आहे हा निर्णय आहे. देशभरात वाढत असलेल्या छेद-छाड व बलात्काराचे प्रकार बघता हा निर्णय विद्यार्थी-शिक्षक हिताचा नाही.


तसेच, बंद पडलेल्या शाळाही अन्य ठिकाणी सुरू करणार आहेत. मात्र ग्रामीण भागात-आदिवासी पाड्यावरील शाळांमध्ये रस्ते, वाहनांची व्यवस्था, पावसाळ्यात नदी नाले यांना पूर आल्यास गावाचा संपर्क तुटतो. गावात शाळा नसल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील व शैक्षणिक नुकसान होईल.


त्यामुळे शासनाने अशा शाळा बंद करू नयेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


यावेळी जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे, जिल्हा संघटक कोमल पगारे, शहराध्यक्ष अनिल डंबाले व इतर कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages