यशदा पुणे येथील अधिकारी, अष्टपैलू व्यक्तिमत्व,लेखक, विचारवंत, संपादक, शिक्षण तज्ञ, 21 पदव्यांचे मानकरी डॉ. बबन जोगदंड यांचा 26 नोव्हेंबर संविधान दिवशी वाढदिवस...या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख...
डॉ. जोगदंड यांचा संपर्क क्रमांक : मो. 9823338266
बहुमोल रत्ने हिरे, माणिक, मोती सर्वांनाच आवडतात.ते अनमोल असतात. आणि सर्वांनाच ते आकर्षित करून घेतात. कारण ती खूप दुर्मिळ असतात. त्यांची निर्मिती ही कारखाण्यात होत नाही तर खाणीमध्ये होते. असेच एक अनमोल रत्न नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यात सावरगाव माळ या डोंगरांमध्ये वसलेल्या खाणरुपी गावामध्ये जन्मले आणि *ते रत्न म्हणजे डॉ. बबन जोगदंड होत.
त्यांचं शिक्षण ग्रामीण भागात झालं. पण त्यांच्या विद्वत्तेकडे बघितले तर ग्रामीण भागातही बहुमोल रत्ने असतात. हे सत्य नाकारता येत नाही. निरक्षर आई-वडील. जिल्हा परिषद शाळा. शैक्षणिक सुविधेचा अभाव. एवढे असले तरी सुद्धा त्यावर मात करून यश प्राप्त करणं, हे फार कमी जणांनाच जमते. ते डॉ. बबन जोगदंड यांना जमलं. प्रचंड मेहनत करून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे त्यांनी साकार केलं. आज महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी स्वयंदीप म्हणून डॉ. जोगदंड प्रकाशले असं म्हणायला हरकत नाही.
स्वयंदीप म्हणजे स्वतः प्रकाशित होऊन इतरांना प्रकाश देणे होय. आणि हे डॉ. बबन जोगदंड साहेबांना हुबेहूब लागू पडते. ज्ञानरूपी प्रकाशमय प्रवास साकार करण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागले. प्रयत्नांचा खडतर मार्ग पत्करावा लागला. पण सोबत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची ढाल होती.आणि त्यामुळे आलेल्या संकटावर ते सहजपणे मात करू शकले. बाबासाहेबांचा एक विचार आहे. 'माणूस अजन्म विद्यार्थी असतो' हे ध्येय मनाशी घेवुन,ते शिक्षणाच्या वारुवर स्वार झाले.. आणि हा त्यांचा शिक्षणाचा वारू गरुडझेप घेऊ लागला. जो की अजूनही थांबला नाही. हे विशेष!
त्यांनी आजपर्यंत १५ विषयात पदवी ६ विषयात डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स असे २१ विषयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत ६ विषयांमध्ये त्यांनी एम. ए. पूर्ण केले आहे. ते म्हणजे समाजशास्त्र , राज्यशास्त्र, लोकप्रशासन, मराठी, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र होय. एवढेच नाही तर त्यांनी भविष्यात पंचवीस विषयांमध्ये पदवी घेण्याचा निश्चय केला आहे. तो अविरतपणे चालू आहे. पत्रकारितेमध्ये त्यांनी पी.एचडी.ही सर्वोच पदवी मिळवली आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षांपासून पत्रकारितेला सुरुवात केली. १० वर्ष त्यांनी विविध वृत्तपत्रात काम केले. काही काळ ते नांदेड आकाशवाणीवर उद्घोषक म्हणूनही होते. अर्थातच त्यांच्या लेखणीला दर्जेदार धार आहे . भाषेवर प्रभुत्व प्रस्थापित झाले आहे. त्यांना नामांकित व्यक्तीच्या मुलाखती घेण्याची संधी प्राप्त झाली. यातून त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांना गोड वाणी लाभल्यामुळे ते माणसे जोडत गेले. आपल्या लेखनाला गती दिली. आज त्यांच्या नावावर दहाच्या वर ग्रंथ आहेत. आणि आज त्यांच्या प्रेरणेने 'स्वयंदीप' प्रकाशन संस्था आणि स्वयंदीप करिअर अकॅडमी ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये दिमाखात उभी आहे. त्यातून नामांकित अधिकारी घडत आहेत. त्याचबरोबर प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून मान्यवर लेखक, कवी, विचारवंत यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आहे त्यांनी *अनेक माणसं जोडल्यामुळे त्यांच्यावर 'मानवी संबंधाचा बादशाह' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. कुठलेही अडले नडले काम घेऊन व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात. अनेक अधिकारी - कर्मचारी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात.सर्वांना ते हसतमुखाने मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेकांना जीवनामध्ये उभं करण्यासाठी सहकार्य केले आहे.
आज ते महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रभारी अधिकारी (प्रकाशन ) या पदावर कार्यरत आहेत. तेथे ते वर्ग -1 आणि वर्ग -2 हया अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही ते करतात यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे काम केले आहे.
ते चांगले वक्ते आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, सूत्रसंचालक, इव्हेंट मॅनेजर आहेत, कुशल संघटक, उत्तम व्याख्याते आहेत. त्यांनी आपले शासकीय सेवेत कर्तव्य जपत असताना समाजाकडे, चळवळीकडे दुर्लक्ष केले नाही. सामाजिक चळवळींमध्ये ते हिरीरीने भाग घेतात. गरजूंना मार्गदर्शन करतात. मागेल त्यांना सल्ला देतात. 'युपीएससी'मध्ये यशस्वी झालेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या व अन्य यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती घेऊन विद्यार्थी मित्रांमध्ये प्रेरणा निर्माण करतात. प्रत्येक कामाचे सोलुशन डॉ. जोगदंड यांच्याकडे आहे. त्यामुळे लोक त्यांच्याकडे येतात. असे शक्य असेल तसे ते त्यांची कामे आनंदाने करतात. म्हणूनच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे. ते सातत्याने सेवा करीत आहेत. हा त्यांचा गुण म्हणजे 'स्वयंदीप' होवून प्रकाश देणेच म्हणावे लागेल. त्यांचा समाजामध्ये फार मोठा लौकिक आहे. अनेक मोठमोठे कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत घडवून आणले आहेत. महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक देशांचा दौरा केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाकडून आणि बऱ्याच संस्थेकडून गौरविण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. शासनाच्या अनेक समित्यांवर विद्यापीठांच्या अभ्यास मंडळांवर सुद्धा ते कार्यरत आहेत तसेच यशदाच्या लोकप्रिय अशा यशदा 'यशमंथन' या मासिकाचे ते संपादकही आहेत. तसेच अधिकाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे ते राज्याचे सहसचिव आहेत ते स्वतः महाराष्ट्रातील अनेक नामवंतांना दुबईमध्ये 'जीवनगौरव पुरस्कार'देऊन सन्मानित करतात. गेल्या तीन वर्षांपासून ही परंपरा त्यांनी सुरू केली आहे. त्यांनी आतापर्यंत दोनशे लोकांना दुबईला नेले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना दुबई येथे मानाचा सन्मान मिळतो, हे भरीव कार्य त्यांच्या हातून घडत आहे. त्याचबरोबर स्वयंदीप शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ५ जणांना ते 'स्वयंदीप सन्मान जीवनगौरव पुरस्कार'देतात. त्यांनी अनेकांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. दुसऱ्यांसाठी नेहमीच ते सदैव कार्यरत असल्यामुळे लोक त्यांना खूप मानसन्मान देतात. *एक उत्कृष्ट लेखक, संपादक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, सूत्रसंचालक, इव्हेंट ऑर्गनायझर, माणसे जोडणारा माणूस,कुशल संघटक, चळवळीतील कार्यकर्ता असे अनेक रूपे त्यांच्यात दिसतात.
असे गौरवशाली अधिकारी डॉ. बबन जोगदंड साहेब यांचा 26 नोव्हेंबर संविधान दिनी वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांना भावी आयुष्यासाठी दिर्घायुष्य लाभो आणि असेच समाजासाठी कल्याणकारी कार्य त्यांच्या हातून घडावे. आणि मानसन्मान वाढत जावा. ह्या भरभरून शुभेच्छा ...!
बाबुराव पाईकराव
सहशिक्षक
कै.बापुराव देशमुख मा.व उच्च मा. विद्यालय,
डोंगरकडा.ता.कळमनुरी. जि.हिंगोली.
📞 मो. 9665711514
No comments:
Post a Comment