मुंबई: राज्यात पुणे ,अमरावती , नागपूर ,औरंगाबाद विभागात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंम्बर ला 2020 रोजी होणार आहे .या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे.या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी , यासाठी मतदारांनी मत कसे नोंदवावे याबाबत भरत निवडणूक आयोगाने सूचना केल्या आहेत.
या सूचनांमध्ये केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शीच्या स्केच पेंनेच मत नोंदवावे. इतर कोणतेही पेन ,पेन्सिल,बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रमांक नोंदवावा या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे.निवडून द्यावयाच्या उमेदवारांची ख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत ,तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.
आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 1,3,4 इत्यादीप्रमाणे नोंदवू शकतात.एक उमेदवाराच्या नावसमोरील रकान्यात एकच पसंतीक्रमांकाचा अंक नोंदवावा.तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.पसंतीक्रम हे केवळ 1,2,3इत्यादी अश्या अंकामध्येच नोंदविण्यात यावेत . ते एक दोन तीन इत्यादी अश्या शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.
पसंतक्रमांक नोंदवताना वापरावयाचे अंक हे देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवू शकता. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी ,आद्यक्षरे, नाव किंव्हा अन्य कोणताही शब्द लिहू नये.तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क किंव्हा × क्रॉसमार्क अशी खून करू नये.अशी मतपत्रिका अवैध ठरेल.आपली मतपत्रिका वैध ठरावी,याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमांकाचे मत नोंदवने अत्यंत आवश्यक आहे.अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे,अनिवार्य नाही ,असे भारत निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment