नाशिक : सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक जिल्ह्याच्या वतीने डॉ.पायल तडवी यांच्या केस संदर्भात मा. कुलगुरू आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांना दि. २९ ऑक्टोबर २०२० खालील मुद्द्यांवर निवेदन दिले होते.
निवेदनाच्या मागण्या :
१. रॅगिंग विरोधी समितीचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवून त्या अहवालातील शिफारशी प्रमाणे तिघं गुन्हेगारांना निलंबित करण्याची कारवाई न करणाऱ्या अधिष्टाता व आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू ह्यांची त्यांच्या पदावरून त्वरित हकालपट्टी करावी.
२. सर्वोच्च न्यायालयाने जरी आरोपींना महाविद्यालयात प्रवेश करण्यास परवानगी दिली असली तरी अजूनही रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार आरोपींना महाविद्यालयातून निलंबित करण्याची कायदेशीर प्रक्रिया महाविद्यालय व आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पूर्ण करावी.
३. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलने ताबडतोब आरोपींची चौकशी पूर्ण करून त्यांचे वैद्यकीय व्यवसायाचे लायसन्स रद्द करावे.
४. डॉ. पायल तडवी प्रकरणाची सेशन कोर्टातील सुनावणी अट्रोसिटी कायद्यातील तरतुदीनुसार विशेष खास न्यायालयात जलद गतीने पूर्ण करावी.
५. उच्च शिक्षणातील दलित , आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा जातीयवादी मानसिकतेतून छळ केला जातो व त्यातून रोहित वेमुला ते डॉ. पायल तडवी असे शेकडो बळी आजपर्यंत गेले आहेत. ह्यास प्रतिबंध करणारा आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच स्थापन करावे.
हे निवेदन देऊन ही रॅगिंग समिती कडून कुठलेचं पाऊल उचलले जात नाही हे लक्षात घेत संघटनेच्या वतीने मा. कुलगुरू यांना पुन्हा स्मरण करून देण्यास निवेदन देण्यात आले. प्रसंगी स्टुडंट वेल्फेअरसोबत चर्चा केल्यानंतर रॅगिंग समिती समोर त्यांनी २ वेळा डीले करून घेत वकिलांमार्फत आपण म्हणणे मांडण्याची व त्या समितीत संबंधित आरोपींच्या वकिलांनी स्थान असल्यासंबंधी परवानगी मागितली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी येत्या काही काळात रॅगिंग समिती समोर हजर राहत यांनी स्वतःची बाजू मांडली नाही तर विद्यापीठामार्फत त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन स्टुडंट वेल्फेअरच्या मार्फत देण्यात आले आहे.
संघटनेचे राज्य सचिव मा.संविधान गांगुर्डे यांनी न्याय प्रक्रियेवर विश्वास दाखवत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती विद्यापीठाला केली असून मागण्यांसंबंधी ठोस पाऊल उचलले न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचे संकेत दिले आहे.
प्रसंगी संघटनेचे राज्य सचिव संविधान गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे,महासचिव निखिल भुजबळ,दिपक पगारे,चेतन जाधव, कोमल पगारे इ. कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या केस संदर्भात काय कार्यवाही करण्यात आहे याचा तपशील देण्यात यावा याकरिता कुलगुरूंना स्मरनणपत्र देण्यात आले.
No comments:
Post a Comment