क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी मा.अंजलीताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भावंडांना घेतले दत्तक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 28 November 2020

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी मा.अंजलीताई आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भावंडांना घेतले दत्तक

वाशिम :

साक्षी संतोष सातव ,तुषार संतोष सातव
नीमजगा(वाशिम) या भावंडांना वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश सदस्या तथा अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ.किराणताई गिऱ्हे यांनी दत्तक घेतले.आई वडिलांचे छत्र हरपले आहे आणि मामा मुलांची देखभाल करतो पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्या मुळे दत्तक घेतले.

ताईंनी या पूर्वीच पत्राद्वारे सूचना केल्या होत्या की कुणाचाही वाढदिवस हा विनाकारण पैसे खर्च करून आणि देखावा करून न करता कुण्याही गरजू ला मदत करून करा !! "खारीचा वाटा उचलावा असे वाटले आणि त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली.असे  किरण गिऱ्हे
म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Pages