सम्यकच्यावतीने बार्टी महासंचालकाला निवेदन ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 28 November 2020

सम्यकच्यावतीने बार्टी महासंचालकाला निवेदन !





पुणे - वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर व जिल्ह्याचेवतीने दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट  पुणेचे महासंचालक डॉ. धम्मज्योती साहेबांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना एमपीएससी( MPSC)चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांची संख्या ४०० आहे नागपूर औरंगाबाद या ठिकाणी लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती मध्ये अडकले होते आणि त्या ४०० विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे विद्यावेतन मागील सात महिन्यांपासून शासनाच्यावतीने देण्यात आलेलं नाही. त्या विरोधामध्ये निवेदन सादर करण्यात आले. ४०० विद्यार्थ्यांचे मागील सात महिन्यांपासून विद्यापीठं रुपये ९००० प्रति महिना प्रति बाकी आहे.   अनेक विद्यार्थी खेड्यांमधून आलेले आहेत काही विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये राहत असून त्यांचे लाईट बिल त्याचप्रमाणे घराचं भाडं अनेक महिन्यांपासून थकले होते. काही घरमालकांनी तर लॅपटॉप असेल त्यांच्या जीवन उपयोगी वस्तू असतील पुस्तके असतील अशा गोष्टी त्यांच्याकडे जप्त करून ठेवलेल्या आहेत जर हे पैसे मिळाले तात्काळ त्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत तर ते घर मालक त्यांना त्या वस्तू परत देणार नाहीत अशी परिस्थिती औरंगाबाद व नागपूर मध्ये आहे.काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचा चालावा म्हणून काही सावकारांकडून छोट्या मोठी रक्कम ही कर्ज स्वरूपामध्ये घेतलेली आहे परंतु विद्या वेतनच नाही तरी कर्ज फेडायचं कसं असा मोठा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग  इन्स्टिट्यूट चे महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेबांना या प्रकरणी निवेदन सादर केले व त्या निवेदनाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला व त्यांनी लवकरच या प्रकरणांमध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना त्यांचे विद्यावेतन देण्याची कबुली दिली.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शुभम ज्ञानेश्वर चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रसिद्धीप्रमुख अक्षय बचुटे, वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते ओंकार कांबळे त्याचबरोबर पत्रकार रामदास लोखंडे  हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages