अमरावती :
भारतातल्या शहरांमधील हवा प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील या हवा प्रदूषणाला खाजगी वाहनांची वाढती संख्या ही जबाबदार आहेच पण नागरिकांना , मजुरांना रोजच्या प्रवासा करीत पुरेषा प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करून देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी परिसर व सम नेट यांच्या “लाख को पचास” या मोहिमे अंतर्गत अमरावतीत १ लाख प्रवाशांवर ५० सिटीबसेस असाव्यात असे निवेदन पालकमंत्री यशोमती ठाकुरांना दिले. निवेदन घेताना हि मागणी मुख्यमंत्र्यान पर्यंत करू असे त्यावेळी ताई म्हणाल्यात.
राज्यभर चालविलेल्या या मोहिमेत अमरावती , मुंबई , पुणे , नाशिक , नागपूर , औरंगाबाद हि महत्वाची शहरे होती ज्याद्वारे इतर शहरांचा देखील आढावा घेतला गेला. निवडलेल्या या शहरातील प्रशासनाने योग्य ती पावले उचलत सिटीबसेसच्या संख्या वाढविल्या. मात्र अमरावतीत अद्यापही हालचाली नाहीत. शहराची लोकसंख्या २०११ नुसार ६.४७ लाख व बसेस किती तर फक्त २५. त्यामुळे पूर्वीपासूनच आपल्या इथे बसेसच्या अडचणी आहेत मात्र प्रशासनाने योग्य ती पावले उचलिली नाहीत. त्यामुळे मजूर, महिला तसेच सामान्य नागरिकांना याचा त्रास तर होतोच मात्र खाजगी वाहनांमुले होणारे प्रदूषण देखील वाढले. म्हणून योग्य वेळी निर्णय घेऊन प्रशासन व सरकारने परिस्थिती सुधारावायला हवी अशी मागणी अमरावतीकरांनी मोहिमे दरम्यान केली होती. राज्यभारातून मोहिमेकरीता १० हजार पेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन सह्या दिल्या तर १०० संस्थांनी देखील त्यांचे समर्थन नोंदविले.
'परिसर' हि पर्यावरण विषयक संस्था सार्वजनिक वाहतुकीद्वारे पर्यावरणाच्या समतोलाकरिता मागील काही वर्षापासून काम करत आहे. सुरक्षित, ताणरहित आणि आरामात प्रवास करता आला पाहिजे, त्यासाठी शहरात बसेसची संख्या वाढवली पाहिजे म्हणून “लाख को पचास” हि मोहीम Sustainable Urban Mobility Network (SUM Net India) यांनी ही मोहीम सुरू केली असून ‘SUM Net India हे भारतातील विविध व्यक्ती, स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था तसेच शाश्वत वाहतुकीच्या कार्यास वाहिलेल्या चळवळी, अशा विविध समविचारी घटकाचा समूह आहे.
‘SUM Net India’ द्वारे व 'परिसर आयोजित “लाख को पचास" या मोहिमेअंतर्गत सिटी बसेसच्या संख्या वाढवण्या करता सोशल मीडियाद्वारे शहर स्तरीय, राज्य स्तरीय वेबिनार आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व स्थानिक अशा सर्व स्तरातील वाहतूक विषयातील तज्ञ, पत्रकार, महिला, कामगार, बसवाहक, विद्यार्थी यांचा सहभाग होता. या सर्व मान्यवरांनी आपआपले अनुभव, सार्वजनिक वाहतुकीतील त्रुटी, समस्या आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दल चर्चा केली. अंतिमत महाराष्ट्र राज्यातील विविध शहरातील नागरिकांच्या, प्रवाशांच्या समस्या समजून घेत "लाख को पचास" ही मागणी आता जोर धरत आहे. हे निवेदन देतांना परिसरच्या या मोहिमेचे राज्य समन्वयक विकास तातड व सोबत मोहिमेचे अमरावती जिल्हा समन्वयक प्रशांत राठोड हे उपस्थित होते .
No comments:
Post a Comment