ऑल इंडिया पँथर सेनेचे परात भेजो आंदोलन समाज कल्याण आयुक्तांना दिले निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 December 2020

ऑल इंडिया पँथर सेनेचे परात भेजो आंदोलन समाज कल्याण आयुक्तांना दिले निवेदननांदेड प्रतिनीधी:

विविध मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला परात भेजो आंदोलन करण्यात आले, असे निवेदन व परात समाज कल्याण अयुक्त नांदेड यांना देण्यात आले.


यावेळी ऑल इंडिया पँथर सेना उत्तर जिल्हाध्यक्ष बालाजी सावंत, जिल्हा महासचिव भिमराव बुक्तरे, दक्षिण जिल्हाअध्यक्ष किरण फुगारे महेंद्र शिंदे, रजनीकांत सावंत सुजित सूर्यवंशी व इतर जण उपस्थित होते.


या होत्या त्यांच्या खालील मागण्या

विशेष मागन्या :-

- स्वाधार योजनेचा प्रलंबित निधी तात्काळ द्या! 


- रमाई घरकुलाला वाढीव निधी तात्काळ द्या!


- महामंडळाचे कर्ज माफ करता की नाही, महामंडळाला वाढीव निधी देता की नाय उत्तर द्या!


- मागासवर्गीयांना जमिनी, ट्रॅक्टर, विहिरी तात्काळ द्या! 


- संविधान मूल्य रुजवणाऱ्या समताधुतांचे थकीत मानधन तात्काळ द्या!


- बार्टीच्या पात्र विद्यार्थ्यांची फिलोशिप देता की नाही उत्तर द्या?


- सारथीला वेगळा न्याय बार्टीला वेगळा न्याय हा जातीयवाद नाही तर काय हाय?


- शिष्यवृत्ती एकदम जमा करा! 


- अट्रोसिटी ऍक्ट पीडितांचा निधी देता की नाय उत्तर द्या!


- सामाजिक न्याय विभाग आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!


- आमचा निधी इतरत्र वळवणाऱ्यानी खुर्ची खाली करा!


- उरली फक्त परात ती ही लुटून खाता काय? 


- अनुसूचित जातीचाच सामाजिक न्याय मंत्री करा!

No comments:

Post a Comment

Pages