किनवट, जि. नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्ष पदी किनवट तालुक्यातील भूमिपुत्र विश्वदीप मुनेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष सचिन तडवी, उपाध्यक्ष मालोदे तर सचिव पदी साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम सर्वानुमते पार पडला. या वेळी राज्याचे संपर्क प्रमुख संजय पवार, बीड जिल्ह्याचे सचिव महेश रोकडे, उपाध्यक्ष रमेश माने आदी मान्यवर उपस्थित होते.नवीन कार्यकारिणीचे तसेच जिल्हाध्यक्ष विश्वदीप मुनेश्वर यांचे अंबाडी ग्रामस्थ व मित्रपरिवारा तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील परिचर यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment