प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे;न्यायमूर्ती जहांगीर पठाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 13 December 2020

प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे;न्यायमूर्ती जहांगीर पठाण

 

किनवट,दि.१३ : प्रत्येक व्यक्तीने समोरच्या व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घ्यावी.तसेच आपले कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडत जावे,यामुळे कुणाच्याही मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही,असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले.

    महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा (ता. किनवट) येथे तालुका विधी सेवा समिती व उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या वतीने  " जागतिक मानवी हक्क दिन", नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित जनजागृती कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते.

     यावेळी सह दिवाणी न्यायाधीश जे.एन.जाधव, आमदार भीमराव केराम व उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, वनपरिक्षेत्राधिकारी विनायक खैरनार व अक्षय राठोड यांनी मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाची सुरुवात "माणसाने माणसाशी माणसासम वागवावे,"या प्रार्थनेने करण्यात आली.  वकील संघाचे सचिव अॅड.डी.जी काळे यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी आभार मानले. 

   कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कॉ. गंगारेड्डी बैनमवार, प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे,प्रा.डॉ. पंजाब शेरे,वकील संघाचे उपाध्यक्ष एड.मिलिंद सर्पे, पवार स्वामी, उद्धव रामतिर्थकर, अॅड. सुनिल येरेकार,आशिष शेळके, आदि मान्यवरांसह पाटील अकॅडमी, राजपथ व व्हिजन अकॅडमीचे बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक शारीरिक अंतर ठेऊन उपस्थित होते .

                                              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य राजाराम वाघमारे, उपप्राचार्य सुभाष राऊत, प्रा. पंडीत घुले, पर्यवेक्षक किशोर डांगे, अंबादास जुनगुरे, प्रमोद मुनेश्वर व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Pages