सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन-- नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 December 2020

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन-- नसोसवायएफ


नांदेड: दि.२५ रोजी नॅशनल एससी, एसटी,ओबीसी,स्टुडन्ट अँड युथ फ्रंटने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम त्वरित जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, नांदेड समोर तीव्र आंदोलन केले. तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर वितरित करण्यास असक्षम असल्यामुळे विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. मागील दोन वर्षांपासून भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही मिळत नाही. भारत सरकार शिष्यवृत्तीचा उद्देश अनुसूचित जाती-जमाती व इतर भटक्या विमुक्त जातींच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित संवर्धन करण्यासाठीच आहे. पण आज हा हेतु पूर्ण होताना दिसून येत नाही. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते.पण शैक्षणिक वर्षात पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडले आहे. उच्च शिक्षणामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. या संदर्भात शासनाला विविध संघटनेने तसेच नसोसवायफने निवेदन देऊन सुद्धा सामाजिक न्याय मंत्री व समाजकल्याण विभाग विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. कोव्हिड-१९मूळे आदीच आर्थिक परिस्थिती खलावलेले विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत असतांना आर्थिक समस्येला समोर जात आहेत. मागील शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधारची रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नसल्याने चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशापासून वंचित राहत आहेत.या संदर्भात दिनांक १५ डिसें. रोजी निवेदन दिले होते.

या निवेदनानुसार संघटनेने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधारची पूर्ण रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी केली होती. पण या मागणीकडे मागील दहा दिवसापासून सामाजिक न्याय मंत्री व समाजकल्याण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज रोजी नसोसवायफ या संघटनेने आज तीव्र आंदोलन केले असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे, राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे,महाराष्ट्र प्रभारी, मराठवाडा संघटक प्रकाश दिपके उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे., जिल्हा सचिव अक्षय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सुजय पाटील,जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रसकर,सागर घोडके,बाळू भाग्यवंत, डॉ. प्रविण सावंत,दिनेश येरेकर, अनुपम सोनाळे, सुमित कांबळे, संकेत मेहत्रे, आदिनाथ डोपेवाड, शाहिद शेख, जुनेद शेख, अनिल इजगरे,विशाल घोसले, मधुकर काळे, यांसह मोठ्या संख्यने उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages