ध्रुपताबाई गणपतराव भवरे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 31 December 2020

ध्रुपताबाई गणपतराव भवरे यांचे निधन

किनवट : येथून जवळच असलेल्या घोटी (ता. किनवट) येथील ध्रुपताबाई गणपतराव भवरे (वय ८७) यांचे गुरुवारी (दि. ३१) दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर घोटी ते भिमपूर मार्गावरील पाटागोटा येथील स्मशानभूमीत  गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार  करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, सहा मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जनार्धन गणपतराव भवरे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष कविराज गणपतराव भवरे, विजय गणपतराव भवरे, लक्ष्मण गणपतराव भवरे यांच्या त्या मातोश्री व स्तंभलेखक उत्तम कानिंदे आणि सकाळ अ‍ॅग्रोवनचे उपसंपादक किरण भवरे यांच्या त्या आजी होत.

No comments:

Post a Comment

Pages