पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 December 2020

पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन

                   औरंगाबाद दि. 09  - शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांच्या मार्फत कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या रिक्तपदांच्या भरतीसाठी. दिनांक 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विभागाचे संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in यावर नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात राज्यातील  नामांकिंत उद्योजकांनी  35000 पेक्षा अधिक पदे ऑनलाईन पध्दतीने अधिसूचित केलेली असून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. 

                   ऑनलाईन पध्दतीने मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना दिनांक 13 डिसेंबर 2020 पर्यंत एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑलनाईन अप्लाय करावे. ज्या उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी केली नाही त्यांनी एम्प्लॉयमेण्ट टॅब वरील जॉब सीकर हा पर्याय निवडून नोंदणी करावी व त्यानंतर पात्रतेनुसार अप्लाय करावे. अप्लाय केलेल्या पदासाठी मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ याबाबतची माहिती उमेदवारांना एसएमएस, दूरध्वनी , ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.

                    एम.बी.ए, वैद्यकीय शाखेचा पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधर, डिप्लोमा, आय.टी.आय, बारावी तसेच दहावी पास व नापास उमेदवारांसाठी वरीलपदे अधिसुचित करण्यात आलेली असून, त्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊन रोजगाराची संधी प्राप्त करणे शक्य होणार आहे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 0240-2334859 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  मेळाव्यासाठी अधिसूचित पदांची माहिती दररोज अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत संकेतस्थळावर लॉग-इन होऊन प्राप्त होणाऱ्या रिक्त पदांना ॲप्लाय करावे जेणेकरुन मुलाखतीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील असे आवाहन श्री.एन.एन.सूर्यवंशी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी केलेले आहे.  


No comments:

Post a Comment

Pages