शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कृषी विधेयक बिल रद्द करण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, मानव अधिकार संरक्षण मंच, युथ मोव्हमेंट, द प्लॅटफॉर्म ची संयुक्तिक निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 7 December 2020

शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले कृषी विधेयक बिल रद्द करण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, मानव अधिकार संरक्षण मंच, युथ मोव्हमेंट, द प्लॅटफॉर्म ची संयुक्तिक निदर्शने



नागपुर:

कोविड-19 चा प्रादुर्भाव असताना जून 2020 मध्ये लोकसभेत कृषी विधेयक बिल मांडण्यात आले होते. सदर शेतकऱ्यांचे उत्पन्न व्यापार वाणिज्य विधेयक (प्रोत्साहन व सुलभता), शेतमाल हमीभाव आणि कृषी सेवा करार (सबलीकरण व संरक्षण), अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) बिलाला मागील काही दिवसांपूर्वी मान्यता देण्यात आली. सदर बिल हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळे भांडवलदार वर्ग प्रभावी होऊन शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा सरकारचा घाट असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. त्यामुळे संपुर्ण देशातील शेतकरी हा रस्त्यावर उतरला आहे. कृषी विधेयक बिल तात्काळ रद्द करण्याकरिता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तसेच संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, मानव अधिकार संरक्षण मंच, युथ मोव्हमेंट, द प्लॅटफॉर्म द्वारे संयुक्तिक निदर्शने करण्यात आली. निदर्शनात प्रामुख्याने रामभाऊ बागडे, भूषण वाघमारे, आशिष फुलझेले, वैभव कांबळे, राजीव खोब्रागडे, प्रशांत डेकाटे, महेश बन्सोड, सुहास राऊत, सुरेन्द्र डोंगरे, शशिकांत गजभिये, असित दुर्गे, अनुराग ढोलेकर, सुमित कांबळे, नितीन गायकवाड, सुमित मेश्राम, अभिजित फुलझेले, संदीप वाघमारे, सचिन रामटेके, करुणा कांबळे, सायली फुले, मीनाक्षी कांबळे, श्रुती कांबळे आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Pages