बहुजन समाज पार्टी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 4 December 2020

बहुजन समाज पार्टी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन



नांदेड :

    महाराष्ट्रात दर दिवशी साधारणपणे ४५०० ते ५०००           गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते .सदर बाबा विचारात घेता,  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना  निमित्य  शहरात बहुजन समाज पार्टी च्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ६डिसेंबर सकाळी  १० वाजता भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .

       कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नये,गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मनीष कावळे युवा जिल्हाध्यक्ष विक्की वाघमारे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Pages