राष्ट्रीय ग्राहक दिन वेबिनारद्वारे 24 डिसेंबरला साजरा होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 21 December 2020

राष्ट्रीय ग्राहक दिन वेबिनारद्वारे 24 डिसेंबरला साजरा होणार

नांदेड, दि. 21 :-  जनता व ग्राहकांमध्ये ग्राहकांच्या हक्काची व संरक्षण कायदाची जागृती होण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन वेबिनार माध्यमाद्वारे गुरुवार 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर व प्रमुख वक्ते रविंद्र बिलोलीकर व सदस्य जि.ग्रा.त.नि.मंचाचे डॉ. बा.दा जोशी व अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे  अरविंद बिडवई यांची उपस्थिती राहणार आहे. 


No comments:

Post a Comment

Pages