अवैध वाळु उत्खनन स्थळाची व जागोजागी साठवुन ठेवलेल्या वाळुची ड्रोन कॕमेरा व्दारे चौकशी करावी : पञकार संरक्षण समिती नांदेड ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 2 December 2020

अवैध वाळु उत्खनन स्थळाची व जागोजागी साठवुन ठेवलेल्या वाळुची ड्रोन कॕमेरा व्दारे चौकशी करावी : पञकार संरक्षण समिती नांदेड ची मागणी



 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यात तथा सर्व तालुक्यात वाळु माफियाने परप्रांञीय मजुराकडुन अवैध वाळु उत्खनन करुन नांदेड जिल्हा त  कहर केला आहे .बिहारी व युपी लोकांकडुन क्षुल्लक दामात अवैध वाळु उपसा करुन तीच वाळु मोठ-मोठ्या धनदाडग्यांना तथा बिल्डर्सना दुप्पट भावाने विकुन आपले घर भरण्याचे काम हे वाळु माफीया करत आहे . 

                एकीकडे शासनाच्या घरकुल या योजनेसाठी वाळु उपलब्ध नसताना बिल्डर्स लोकांचे विविध प्रकारचे अर्पाटमेंट व रो-हाऊस मोठ्या थाठात शहरासह ग्रामीण भागात उभा राहत आहेत .पञकार संरक्षण समिती नांदेड यांनी मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक साहेबांना निवेदनाव्दारे अशी मागणी केली आहे की अवैध वाळु उत्खनन स्थळाची व जागोजागी साठवुन ठेवलेल्या वाळुची ड्रोन कॕमेरा व्दारे चौकशी करावी व अवैध वाळु तत्काळ जमा करुन व अवैध वाळु उपसा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा .निवेदनावर नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड जिल्हासचिव शशीकांत गाढे पाटिल व प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे राऊतखेडकर यांची  स्वाक्षरी आहे.



परप्रांञीय मजुर वाळु काढण्याचे भाव :- 1500 ते 1800 रु 

वाळु ठेकेदाराकडुन विकण्याचे भाव 

एक ब्रास :- 3500 रु

तिन ब्रास :- 22 हजार ते 25 हजार

हायवा :- 30 हजार ते 35 हजार }





No comments:

Post a Comment

Pages