शौर्य दिनाचे अभिवादन घरच्या घरी करा : पोलीस व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे संयुक्त आवाहन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 28 December 2020

शौर्य दिनाचे अभिवादन घरच्या घरी करा : पोलीस व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे संयुक्त आवाहन.

 


 चिंचवड : भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी रोजी प्रत्यक्ष न जाता नागरिकांनी घरच्या घरीच अभिवादन करावे असे संयुक्त आवाहन आज आंबेडकरी पक्ष संघटना प्रतिनिधी आणि पोलीस यांच्या बैठकीमध्ये करण्यात आले आहे.


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे यांचे दालनामध्ये शहरातील विविध पक्षसंघटना मार्फत काम करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकी मध्ये भीमाकोरेगाव या ठिकाणी covid-19 प्रादुर्भाव कालावधीमुळे यंदाच्या वर्षी भिमाकोरेगावचा उत्सव हा केवळ प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये करण्यात येणार असून या बाबतचे मार्गदर्शक आदेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानुसार केवळ पास धारक व्यक्तींनाच अभिवादनासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी जाता येणार असल्याने अन्य आंबेडकरी अनुयायांनी घरच्या घरीच अभिवादन करावे असे आवाहन यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आले आहे.


या बैठकीत पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी राज्य सरकारचे निर्णय व यापूर्वी समाजातील आयोजक पक्ष संघटना व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीबाबत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील चंद्रकांता सोनकांबळे, देवेंद्र तायडे ,राहुल डंबाळे बाबा कांबळे सुवर्णा डंबाळे,  अनिता सावळे , संतोष निसर्गंध  अजीजभाई शेख, सुनील ढसाळ धर्मपाल तंतरपाळे कुणाल वावळकर, विनोद चांदमारे , साकी गायकवाड , मनोज गरबडे, संतोष जोगदंड, अजय लोंढे,राजेंद्र साळवे, रमेश चिमुरकर,प्रकाश भूतकर, विष्णु सरपते , आबा रणधीर , इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे , नविन कोरोना येत आहे कोरिणाचा प्रसार होऊ नये या सर्व नागरिकांनी काळजी घेऊन भिम कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यात यावी असे आवाहन अनिता सावळे यांनी केले आहे .No comments:

Post a Comment

Pages