औरंगाबाद :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)च्या वतीने दि 29 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्र , टी व्ही सेंटर येथे विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबुराजी कदम (राज्यकार्यध्यक्ष)
हे राहणार आहेत तसेच मिलिंद शेळके ,दौलत खरात,पप्पु कागदे , ब्रह्मणांद चव्हाण , विजय सोनवणे ,चंद्रकांत चिकटे, आदींची उपस्थिती राहणार आहे .
या बैठकीत रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकितील कामगिरी येणाऱ्या ,महानगरपालिका निवडणूका संघटनेची सदस्य नोंदणी इत्यादी बाबींचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे.
या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नागराज गायकवाड, अजय ठोकळ , अरविंद अवसरमोल,दिलीप पाडमुख ,मधुकर चव्हाण,किशोर थोरात ,बाळकृष्ण इंगळे ,लक्ष्मण शिवराळे ,राकेश पंडित ई नी केले आहे .
No comments:
Post a Comment