मुंबई-०४-(प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न जाता आपापल्या परिसरात संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन तसेच किमान एक वही एक पेन अर्पण करून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन करावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे.
हारफुले मेणबत्ती अगरबत्ती या नाशवंत वस्तू ऐवजी महामानवाला वह्या पेन आणि शालेय वस्तू अर्पण करून अभिवादन करावे जमा झालेले साहीत्य समाजातील उपेक्षित गरीब आदीवासी विद्यार्थी यांना वाटप करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने राजू झनके यांनी केले आहे. सन ६ डिसेंबर २०१६ पासून महाराष्ट्र भरातून सुरू केलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध संस्था संघटना मंडळे चैत्यभूमी दिक्षाभूमीसह आपापल्या परिसरातील बुध्द विहार , व डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे हे अभियान राबवित असतात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेदेखील गणेशोत्सवात हा उपक्रम राबवितात.परंतु यावर्षी कोरोना संक्रमण काळ असल्याने दादर चैत्यभूमीवर तसेच नागपूर दिक्षाभूमीवर येण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने सरकारी नियमांचे पालन करून यंदाच्या महापरीनिर्वाण दिनी आपापल्या परिसरातील बुध्द विहार व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना भारतीय संविधानातील उद्देशिकेचे जाहीर वाचन व किमान एक वही एक पेन अर्पण करून महामानवाला जाहीर अभिवादन करून एक आदर्श घालून द्यावा असे आवाहन राजू झनके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment