वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने उपोषण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 30 December 2020

वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने उपोषण
नांदेड :  

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन युवक आघाडी च्या वतीने समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे एक दिवशी उपोषण करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2019-2020 संपून गेले तरी स्वाधार योजनेची रक्कम अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही, त्यातच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थी हा अडचणीत सापडला आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा मागण्यांची पूर्तता करण्यात आली नाही.तरी येत्या 20 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते शुद्धोधन कापसीकर यांच्या वतीने देण्यात आला.यावेळी वैभव लष्करे, राज बुध्दे, रितेश जोगदंड, यशवंत गोणारकर, अजय काळे, आकाश चित्ते, कबीर थोरात, चंद्रकांत तारू, वंचित बहुजन आघडीचे जिल्हा उपाध्यक्ष केशव कांबळे, महासचिव श्याम कांबळे, विठ्ठल बगाटे, मिलिंद खरे, वामन तारु, सूरज चवणे, शुभम खंदारे, संतोष मगरे, अरविंद बोयवारे,सूरज सूर्यवंशी, आकाश कंधारे, विकास डोंगरे, अनिकेत सुपे, आशिष कोल्हे, मायाभाऊ नांदेडकर, उमाकांत गोडबोले, ऋषिकेश सोनकांबळे,सुबोध धुतुरे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages