नेल्सन मंडेला यांनी रंगभेदा विरुद्ध दिलेला लढा हा मानवअधिकाराचा ; समतेचा लढा होता - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 January 2021

नेल्सन मंडेला यांनी रंगभेदा विरुद्ध दिलेला लढा हा मानवअधिकाराचा ; समतेचा लढा होता - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई दि. 27 - महमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध जातिभेदा विरुद्ध दिलेला लढा संपूर्ण जगात मानवमुक्तीचा लढा ठरला.तसाच लढा  दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न नेल्सन मंडेला यांनी  रंगभेदा विरुद्ध दिलेला लढा मानव अधिकाराचा लढा;  समतेचा लढा ठरला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. हॉटेल सहारा स्टार येथे नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड चे वितरण ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ना. रामदास आठवले यांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड समिती आणि  अमेरिकेन विद्यापीठा तर्फे पी एच डी डॉक्टरेट पदवी  प्रदान करण्यात आली. यावेळी मधू कृष्णन;ककर्नल शैलेंद्र सिंह; हास्य कलाकार सुनील पाल; दीपक पटेल;डॉ टांक;  हेमंत रणपिसे ; रतन अस्वारे; दीपक साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. 


 नेल्सन मंडेला आणि नरेंद्र मोदी दोघांच्या ही नावाची अद्याक्षरे एन एम आहेत.नेल्सन मंडेला हे जगात प्रभावी महान  नेते झाले.नुकतेच  जगात एका पाहणी अहवालात असे जाहीर करण्यात आले आहे की जगात सर्वात प्रभावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना जगात पहिला क्रमांकाचा बहुमान मिळाला  असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. 


लॉक डाऊन च्या काळात गरिबांना गरजूंना सर्वाधिक मदत करणारे ; संकटात लोकांना लढण्याची हिम्मत देणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ना. रामदास आठवले यांनी भारतात  लॉकडाऊन काळात मोठे योगदान दिले असल्याने ना. रामदास आठवले यांचा यावेळी डॉक्टरेट पदवी देऊन भव्य सत्कार करण्यात आल्याची माहिती दीपक पटेल यांनी दिली आहे. 


                

No comments:

Post a Comment

Pages