कोण आहेत राकेश टीकैत ? - सुशांत कांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 29 January 2021

कोण आहेत राकेश टीकैत ? - सुशांत कांबळे

टीकैत नावाला दिल्ली नवीन नाही,राकेश टीकैत यांचे वडील चौधरी महेंद्रसिंग टीकैत हे उत्तरेतले अतिशय मोठे शेतकरी नेते. माजी प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग नंतर महेंद्रसिंग टीकैत यांच्या शब्दाला खूप वजन..महेंद्र टीकैत यांनी 88 साली दिल्लीत पाच लाख लोकांचा किसान मोर्चा काढला होता..मुझफ्फरनगर मधील सिसौली मधे बाबा टीकैत यांची पंचायत  बसल्यावर दिल्लीत नेत्यांना घाम फुटत असे..


अश्या बाबा टीकैत यांची ही मुलं नरेश - राकेश "बालियान खाप" मधून येणारी ही टीकैत फॅमिली. महेंद्र टीकैत यांच्या पाश्चात खाप नियमानुसार त्यांच्या मोठ्या मुलाकडे भारतीय किसान युनियनची सूत्रे आली.तर राकेश टीकैत हे BKU चे स्पोक पर्सन म्हणूंन कार्यरत राहिले.नावाला स्पोक पर्सन असले तरी संघटनेवर त्यांचीच पकड मजबूत राहिली.दिल्लीत पण आपण बघितले असेल राकेश टीकैतच ह्या सगळ्या आंदोलनात सेन्टरपॉइंट राहिले..


महेंद्र टीकैत असतील किंवा आता राकेश टीकैत असतील ह्यात जात फॅक्टर पण मोठ्या प्रमाणावर काम करतो (अनेकांना हे मान्य होणार नाही ही गोष्ट वेगळी) त्यासाठी आपण कालची घटना बघितली तरी त्याचा प्रत्यय आलेला दिसेल.आधी पंजाब-हरयाणा मधील शेतकरी असं दिसणारं आंदोलन 26 तारखेच्या नंतर व्ही.एम सिंग/पेंढार वैगरे पंजाब मधील नेते मागे हटले. तर काही पोलिसी दबावाखाली मैदान सोडून गेले.तिथे खंबीर राहिले ते राकेश टीकैत..2 महिने समोर दिसणारी गर्दी कमी झाली तसं हे आंदोलन गुंडाळून राकेश टीकैत यांना अटक करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. अश्यात राकेश टीकैत यांनी त्यांच्या गाव वाल्यांना आर्त साद घातली..त्या प्रसंगी ते भावनिक झाले होते ..


इथेच त्यांच्या वडिलांची पुण्याई कामी येते,महेंद्र (बाबा) टीकैत हे बालियान खाप क्षेत्रात एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व मानले गेले होते..जेव्हा दिल्लीत राकेश टीकैत भावनिक झाले ते एकटे पडले तेव्हा ह्याच पश्चिमी UP भागात जिथे खाप पंचायतचा मोठा पगडा आहे ह्या सगळ्या भागातून रातोरात लोकं गाजीपुर बोर्डरकडे निघताना आपण पहिलीत.काल रात्री जर ही लोकं राकेश टीकैत यांच्या साठी निघाली नसती तर आज कदाचित टीकैत जेल मधे असते..


आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल राकेश टीकैत हे आधी दिल्ली पुलीस मधे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.मागे एका आंदोलनात त्यांच्या युनियन चे दोन लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आंदोलन चिघळे त्यावर त्यांनी ही नोकरी सोडून त्यांच्या वडिलांच्या सोबत पूर्णवेळ युनियन सोबत राहीले..


एम.ए पर्यत शिक्षण झालेले राकेश टीकैत आता खऱ्या अर्थाने ह्या आंदोलनाचा चेहरा बनले आहेत.फक्त आंदोलन ड्राइव्ह करताना त्याच्या सोबत घडणाऱ्या घटनांना सुद्धा त्याची जबाबदारी राहील ही बाब त्यांनी आणि त्यांच्या युनियनी लक्ष्यात घेऊन पुढील पावले टाकावीत असे वाटते.सरकार आंदोलन मोडण्याचा कट करत आहे असे माहीत असताना ट्रॅक्टर रॅली काढणे माझ्या मते ह्या आंदोलनातील पहिली चूक राकेश टीकैत त्यांच्या कडून झाली असो..


परंतु आता त्यांनी परत आंदोलनावर चांगली पकड मिळवली आहे फक्त सत्तापक्षाच्या पथ्यावर पडेल असे कोणतेही कृत्य त्यांच्या संघटनेकडून झाले नाही तर ह्या आंदोलनाने ते त्यांच्या वडिलांच्या उंचीचा नेता ठरतील यात शंका नाही..


     - सुशांत कांबळे

No comments:

Post a Comment

Pages