डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे 27 व्या नामविस्तार सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह,मिलिंद महाविद्यालय परिसर येथे रिपब्लिकन सेनेचे अभिवादन सभा कोरोनाच्या निर्देशाचे पालन करून रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 5 वाजता पार पडली
लोकशाही टिकली तरच देश टिकेल देशातील खाजगीकरण आपल्याला पारतंत्र्याकडे घेऊन जाणारे असल्याने देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आंबेडकरी समूह प्राणपणाने लढा देईल मत असे आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.
याविषयी पुढे बोलताना आंबेडकरी युवकाना बळ देण्यासाठी रिपब्लिकन सेना मैदानात उतरणार असून ओबीसी चे प्रश्न आंबेडकरी चळवळच सोडवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी जोडण्यासाठी गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्याचे सूत्र वापरून वंचितांना राजकीय प्रवाहात आणून राजकीय वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे शहिदांच्या बलिदानातून साकारले असून तत्कालीन पुढार्यांनी स्वार्थासाठी ह्याचे राजकारण केले अशी टीका करत नामांतर शाहिदांचे स्मारक उभारण्यासाठी रिपब्लिकन सेने कडून आंदोलन उभारण्यात येईल लवकरच ह्या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मराठवाडा स्थरीय कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे सांगितले
तसेच नामांतराची लढाई संपलेली नाही ह्याचा पुनरुच्चार केला
नामांतर शाहिदांचे भव्य स्मारक तात्काळ उभारा
विद्यापीठाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आंबेडकरी विद्यार्थ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले
नामांतर शाहिदांचे बलिदान डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी नामविस्तार ही फसवणूक
खासगी विद्यापीठाची निर्मिती आपले शैक्षणिक अधःपतन करण्यासाठी आहे असा आरोप केला
विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यासाठी रिपब्लिकन सेना लढा आहे कुलगुरूंनी ह्याचा पाठपुरावा करावा
आंबेडकरी तरुणांनी निराश न होता चळवळ बळकटीसाठी प्रयत्न करावे
आपले शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,आर्थिक प्रश्न अजून सुटलेले नाहीत मोक्याच्या जागा पटकविण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन
पुण्याशी संभाजीराजे यांचा प्रामुख्याने संबंध असल्याने पुण्याचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे तसेच शनीवारवाड्याला राजमाता जिजाई यांचे नाव देण्यात यावे ही रिपब्लिकन सेनेचे मागणी असून कोरोनाच्या सूचना लक्षात घेऊन या विषयी राज्यभरात आंदोलन करण्याचा आदेश
निवडणूका आल्या की औरंगाबाद की संभाजीनगर हा विषय पुढे आणला जातो नामांतराच्या मुद्द्यापेक्षा औरंगाबाद चा विकास मूलभूत प्रश्नासोबत स्मार्ट सिटी म्हणुवुन घेत असताना दलित वसाहती,गुंठेवारी क्षेत्रातील नागरी वसाहती ह्यांचा खुंटलेला विकास महत्वाचा आहे ह्या साठी नागरी अभियान राबवणे गर्जेचड असल्याचे सांगत धर्माच्या नावावर राजकारण करणार्यांना धडा शिकवावा असे आव्हान केले.
उपस्थिती-केंद्रीय सचिव संजीव बौद्धनकर,प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे,केंद्रीय का.सदस्य आनंद नेरलीकर,प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवडीकर,बंडू प्रधान,मराठवाडा अध्यक्ष माधव जमधडे,मराठवाडा उपाध्यक्ष मुजीब पठाण,मराठवाडा संघटक आनंद कस्तुरे,जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड, महासचिव मधुकर माघाडे नवनियुक्त प्रदेश सदस्य किरण घोंगडे,योगेंद्र चवरे,मुजीब पठाण,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम,नांदेडचे अनिल शिरसे,परभणीचे राजकुमार सूर्यवंशी, अच्युतराव घुगे,बीडचे प्रा.बळीराम सोनवणे,रवी वाघमारे,जालना येथील मेजर चंद्रकांत खरात,विजय शिनगारे, मनीषा साळुंखे आदींसह मराठवाड्यातील सर्व प्रमुख नेते,कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागत अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी केले तर आभार काकासाहेब गायकवाड यांनी मांडले यावेळी मूव्हमेंट वॉट चे सुरेश खरात यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.
No comments:
Post a Comment