मुंबई दि.6 - भारत बौद्धमय करण्याचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अन्य कोणत्याही धर्मावर टीका न करता बौद्ध धम्माचा प्रसार करावा. धम्म प्रसाराची जबाबदारी आपली आहे हे समजून धम्म चळवळीत योगदान देणे हीच खरी धम्म प्रसारक डॉ पी जी ज्योतिकर यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी चेयरमन दिवंगत डॉ पी जी ज्योतिकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. रिपाइं च्या वतीने सांताक्रूझ पूर्वेतील कालिना येथील भीमछाया केंद्रात दिवंगत डॉ पी जी ज्योतिकर यांच्या जाहीर आदरांजली सभेचे आयोजन केले होते.त्यात ना आठवले बोलत होते.
यावेळी विचारपीठावर पूज्य भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो; रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; काकासाहेब खंबाळकर; कमलेश यादव;प्रकाश जाधव; विवेक पवार; प्रकाश मोरे; रमेश गायकवाड;चंद्रशेखर कांबळे; आशाताई लांडगे; जयंती भाई गडा;घनश्याम चिरणकर; रघुनाथ कांबळे; अमित तांबे; सोना कांबळे; श्रीदेवी राठोड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवंगत डॉ पी जी ज्योतिकर हे युवा वयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्म क्रांती मध्ये सहभागी झाले. ते मूळचे गुजरातच्या भलसाना जिल्ह्यातील होते.त्यांनी बौद्ध धम्म प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या नोंदणीकृत मूळ संस्थेचे ते विश्वस्त होते.चेयरमन होते.त्यांनी गुजरात आणि संपूर्ण भारतात बौद्ध धम्म प्रसारासाठी आपले आयुष्य वाहिले. त्यांचे नुकतेच अहमदाबाद येथे कोरोना मुळे निधन झाले. भारत बौद्धमय करण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होणे हीच दिवंगत डॉ पी जी ज्योतिकर यांना आदरांजली ठरेल अशी शोकभावना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत डॉ पी जी ज्योतिकर यांना विनम्र अभिवादन केले.बौद्ध धम्म चळवळ; साहित्य ; समाजसेवा; कला अशा कोणत्याही क्षेत्रातील योगदान देणारे जाणते व्यक्तीमत्व निवर्तल्यानंतर आरपीआय तर्फे त्यांची जाहीर आदरांजली सभा आयोजित करण्यात ना रामदास आठवले पुढाकार घेत असतात. आंबेडकरी चळवळी शी ही त्यांची अतूट बांधिलकी असल्याचे यावेळी अनेक वक्त्यांनी म्हंटले.
No comments:
Post a Comment