कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 January 2021

कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन विभागीय आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई, दि.26 :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे साजरा झाला. कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री. आण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झाले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री.बिपीनकुमार सिंह, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.अभिजित बांगर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्री.संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रक पथक, नवी मुंबई पुरुष पोलीस पथक क्र.1, बँड पथक, डॉग स्कॉड, मार्कस मॅन वाहन, आर.आय.व्ही.वाहन, बीडीडीएस वाहन, वरूण वाहन, मिनी वॉटर टेंडर, रेस्क्यु व्हॅन, नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन वाहन आदिंनी विभागीय आयुक्त श्री.आण्णासाहेब मिसाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी राष्ट्रपती पुरस्कार घोषित श्री.प्रविण पाटील पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील सर्वोच्च 5 हजार 400 फुट उंचीचे कळसुबाई शिखर 3 तास 38 मिनीटात सर करणारा व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद झालेला साडेचार वर्षाचा कु.रिदम टाकळे याचा प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (महसूल) श्री.मकरंद देशमुख, उपायुक्त (पुर्नवसन) श्री. पंकज देवरे, उपायुक्त (पुरवठा) अशोक मुंढे, उपायुक्त (रोहयो) वैशाली राज चव्हाण, उपायुक्त (नियोजन) श्री.अमोल खंदारे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages