निवृत्त सनदी अधिकारी सदानंद कोचे यांच्या 'माय एक्सपेरिमेंट विथ इंडियन डेमोक्रॅटिक इलेक्शन्स' (इंग्रजी)या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 January 2021

निवृत्त सनदी अधिकारी सदानंद कोचे यांच्या 'माय एक्सपेरिमेंट विथ इंडियन डेमोक्रॅटिक इलेक्शन्स' (इंग्रजी)या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पुणे :

 निवृत्त सनदी अधिकारी सदानंद कोचे यांनी लिहिलेल्या 'माय एक्सपेरिमेंट विथ इंडियन डेमोक्रॅटिक इलेक्शन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी पुण्यात संपन्न झाला.

 सदानंद कोचे यांनी हे पुस्तक आपल्या निवडणुका संदर्भातील अनुभवावर लिहिले असून या पुस्तकामध्ये त्यांनी  निवडणुकीमध्ये केलेले विविध प्रयोग,अनुभव उदाहरणासह लिहिले आहेत. त्याचा प्रशासनातील तसेच राजकीय व्यक्तींना फायदा होऊ शकेल.हे पुस्तक पुण्यातील स्वयंदीप प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. अशा प्रकारचे कदाचित हे पहिलेच  पुस्तक असावे. या पूर्वीही कोचे यानी बीडची लोकशाही, व्हॉट वुई कॅन लर्न फ्रॉम साऊथ कोरिया, नो फियर न फेवर या  पुस्तकांचे लेखन केले आहे.आजच्या या

 पुस्तकाचे प्रकाशन नाशिकचे माजी विभागीय आयुक्त आर.आर. माने यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे IAS, दिव्यांग कल्याण आयुक्त  प्रेरणा देशभ्रतार IAS,यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची उपस्थिती  होती

हा कार्यक्रम  कृषी महाविद्यालयातील हॉर्टिकल्चरच्या डॉ.चिमा सभागृहात सोशीयल डिस्टन्स पाळून झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बबन जोगदंड यांनी तर आभार राहुल भातकुले यांनी मानले.कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages