शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला प्रमाणपत्र (Domicile) तात्काळ देण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 January 2021

शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला प्रमाणपत्र (Domicile) तात्काळ देण्यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन


नागपुर :

दहावी पास शिष्यवृत्तीस पात्र अनुसूचित जाती, जमाती, ईतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला प्रमाणपत्र (Domicile) फॉर्म भरल्याच्या दिनांकापासून महिन्या अखेरीस म्हणजेच 30 दिवसानंतर देण्यात येत आहे. सदर कालावधी हा खूप मोठा असल्याकारणाने शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. समाज कल्याण विभागाद्वारे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्याचा दिनांक हा 31 जानेवारी 2021 असून जवळपास विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ह्या महिन्याच्या सुरुवातीला झाली असून बऱ्याच विद्यार्थ्यांनि 10 जानेवारी नंतर रहिवासी दाखल्याकरिता फॉर्म भरला होता पण अद्यापही त्यांना देण्यात आलेली नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहण्याची संभावना उदभवली आहे.


करिता शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला प्रमाणपत्र फॉर्म भरल्याच्या दिनांकापासून आठवड्याच्या आत तात्काळ देण्यात यावे जेणेकरून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही यासंदर्भात मानव अधिकार संरक्षण मंच द्वारे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शनास आणण्यात आले त्यावर उपजिल्हाधिकारी यांनी 3 दिवसात प्रकरणे निकाली लावण्याचे वक्तव्य केले.. निवेदन देतांना मानव अधिकार संरक्षण मंचचे सदस्य आशिष फुलझेले, सुमित कांबळे, तलाश बारसागडे, नयन नगराळे, सुरेन्द्र डोंगरे, मॅक्स बोधी, दुर्गे, सदानंद जामगडे, सचिन रामटेके, अनुराग ढोलेकर, निलेश भिवगडे, संदीप वाघमारे, राकेश सोनूले आदी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Pages