इंदिरा गांधी बी.एड. कॉलेजचे माजी प्राचार्य चंद्रशेखर बाळकृष्ण देशपांडे अनंतात विलीन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 January 2021

इंदिरा गांधी बी.एड. कॉलेजचे माजी प्राचार्य चंद्रशेखर बाळकृष्ण देशपांडे अनंतात विलीन

नांदेड: इंदिरा गांधी बी. एड. कॉलेजचे माजी प्राचार्य चंद्रशेखर बाळकृष्ण देशपांडे(वय ९१, रा.वामननगर ) यांचे शुक्रवारी (दि. १जाने.) रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुले -राजीव, राम, व  मुली - ज्योती, संध्या, रजनी, जावई, व नातवंडे असा परिवार आहे. 

श्री चंद्रशेखर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म १९२९ साली विदर्भातील आजोळी यवतमाळ येथे झाला. लहानपणीच आई वारल्याने ते आईच्या प्रेमाला पारखे झाले . शालेय शिक्षण तेथेच झाले. यवतमाळ ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे तेथे त्याना साहित्याचे बाळकडू मिळाले.मराठी साहित्य व नाटय हा त्यांचा आवडीचा विषय होता. शाळा कॉलेजमध्ये त्यांनी विविध कविता नाट्यछटा सादर केल्या . नागपूर, कामठी, साकोली, अकोला, अंबेजोगाई,  नांदेड येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या कारकीर्दीत 'गीतरामायणा 'सारख्या अनेक कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधन केले . 'झेप' व 'झुळुक '  या सारखे कथा व कविता संग्रह लिहिले .काचेचा चंद्र ,तुझे आहे तुजपाशी, एखाद्याचं नशीब, दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, देवमाणूस, माझे घरटे माझी पिले ,या घर आपलंच आहे, या सारख्या अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले . ते प्रसिद्ध साहित्यिक श्री पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे सहाध्यायी मित्र होते. तसेच कवी श्री शरद सुतवणे  यांचेही मित्र होते.विदर्भ ते मराठवाड्यातील डी .एड./बी.एडच्या विद्यार्थ्यांत त्यांनी नुसतीच साहित्य रुची निर्माण केली नाही तर जीवनात साहित्य नाटयसंस्कृतीचे असणारे महत्व त्यांनी जनमानसात बिंबवले व महाराष्ट्रातील साहित्यविश्वात आपले मोलाचे योगदान दिले .त्यानी कधीही प्रसिध्दी व व्यावसायिक दृष्टीकोनातून साहित्याकडे बघितले नाही .वैयक्तिक जीवनाद्वारेही त्यांनी शिस्त ,काटकसर ,स्वावलंबन,हिंदू संस्कृती ह्यांचा  आदर्श घालून दिला. त्यांचे एक नातू व ज्येष्ठ कन्या ज्योती यांचे चिरंजीव श्री. कृष्णा रविंद्र किंबहुने हे साहित्य अकॅडेमी मुंबईचे प्रादेशिक सचिव म्हणून कार्यरत आहेत .

१९८७ साली नांदेडच्या सरकारी  बी .एड कॉेलेजचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले त्यानंतर ते बरीच वर्षे इंदिरा गांधी बी.एड कॉलेजचे प्राचार्य होते. वामननगर नांदेड येथील रेणुकामाता मंदिर उभारणी मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. बरीच वर्षे ते रेणुका माता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते.

1 comment:

  1. आमचे वडील गेले यावर अजूनहि विश्वास बसत नाही. ते अजून आमच्यात आहेत असे वाटले . शेवटी सत्य हे ' स्विकारावेच लागते. आणखी एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे त्यांच्या जीवनाच्या यशस्वितेत त्यांच्या पत्नी कै .सुनीता चं. देशपांडे हयांची मोलाची साथ होती.
    भावपूर्ण श्रध्दांजली !

    ReplyDelete

Pages