द ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स " नावात कुठलाही बदल करू नये या मागणीसाठी आज डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन च्या वतीने प्र-कुलगुरूंना निवेदन सादर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 7 January 2021

द ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स " नावात कुठलाही बदल करू नये या मागणीसाठी आज डॉ. आंबेडकर टीचर्स असोसिएशन च्या वतीने प्र-कुलगुरूंना निवेदन सादर

  


 औरंगाबाद  :     महामानव डॉ बाबासाहेब बआंबेडकर यांनी   एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयात ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ सुरू करण्याचा संकल्प केला होता. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना प्रशिक्षण देण्याचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा  मनोदय होता.याच धर्तीवर   राजकारणाचेे ज्ञान, संवैधानिक तत्वज्ञान, संसदीय कार्यपद्धती, मुल्यधिष्ठित राजकारण, आर्थिक निती, अंदाजपत्रक, केंद्र-राज्य सबंध, कल्याणकारी तरतुदी, परराष्ट्र धोरण आणि वक्तृत्व कला शिकवण्यासाठी    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाने एक संस्था  सुरू करावी म्हणून शहरातील ज्येष्ठांनी विद्यापीठाला तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे संदीप निवेदन देऊन सुचवले होते .    त्यानुसार एक समिती स्थापन करून   समितीच्या अध्यक्षांनी पाच-सहा बैठका घेतल्या. त्यांनी पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाला भेट दिली.तिथं  ‘द ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ या पॅटर्नची कॉपी करून 'द स्कुल ऑफ गव्हर्नन्स' सुरू आहे. तीच कॉपी करून समितीचे अध्यक्ष विद्यपीठात आले आणि आग्रह धरू लागले की आत्ता, ‘द ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ नव्हे तर 'स्कुल ऑफ गव्हर्नन्स' सुरू करू. प्रशासनाला आणि स्वतः अध्यक्षाना सुद्धा याचा ऐतिहासिक संदर्भ काहीच माहित नव्हता. बाबासाहेब आंबेडकर  यांची  संकल्पना बाजूला राहिली.  ‘ द ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ या शीर्षकाचे ऐतिहासिक महत्व आम्ही जराही कमी होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे .                                                   याच संदर्भात आता पुन्हा या संस्थेच्या नावात विद्रुपीकरण करण्याचा घाट काही लोकांनी जाणीवपूर्वकपणे घातला आहे तरीसुद्धा विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील" ट्रेनिंग स्कूल  फार   एंट्रन्स टू पॉलिटिक्स"  या संस्थेचे नाव जसेच्या तसे ठेवण्यात यावे त्यामध्ये कुठल्याही बदल न करता आपली विद्वत्ता  पाजळणाऱ्या कमी बुद्धीच्या लोकांना लगाम घालावा  .  तरी प्रशासनास नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही कमी बुद्धीच्या लोकांच्या विवेचनाला बळी न पडता यासंदर्भात योग्य ती भूमिका घेऊन आपली भूमिका  जाहीर करावी अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्या सगळ्या परिणामांची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल असा इशार डॉ आंबेडकर टीचर्स असोसिएशनच्या वतीने  प्राध्यापक डॉक्टर किशोर वाघ, डॉ अरुण शिरसाट ,डॉ धनंजय रायबोले, डॉ अरुण कोळी, डॉ .प्रभू राऊत,डॉ गजानन यांच्यावतीने  देण्यात आला.No comments:

Post a Comment

Pages