आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तसेच भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक नेते एल. डि. भोसले यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 12 January 2021

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तसेच भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक नेते एल. डि. भोसले यांचे निधन

पुणे : आज दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता येरवडा, गुंजन चौक पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बौद्ध रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तब्बल 50 पेक्षा अधिक वर्षांपासून आंबेडकरी विचारांची कास धरत महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी मध्ये भोसले यांनी मोठे योगदान दिले आहे. नंतर दलित पँथर या आक्रमक संघटनेचे संस्थापक सदस्य व प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या भोसले यांनी पुढील काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या समवेत राजकारण करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार त्यांनी सम्यक समाज आंदोलन व भारिप बहुजन महासंघ तसेच आज आखिर वंचित बहुजन आघाडी समवेत कार्यक्रम आणि पसंत केले. 

पुणे महानगरपालिका मंडळावर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झालेली आहे.


No comments:

Post a Comment

Pages