राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 12 January 2021

राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

नवी दिल्ली,  : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.


कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन


महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचारी आणि  अभ्यागतांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यालयाचे लघु लेखक कमलेश पाटील यांनी यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

No comments:

Post a Comment

Pages