बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ ; एक बौद्ध संस्कार केंद्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 11 January 2021

बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊ ; एक बौद्ध संस्कार केंद्र

 

जो विचार,जो संस्कार,जी प्रेरणा जेव्हा समता, स्वातंत्र, बंधुत्व,मैत्री,न्यायाची शिकवण देऊन समताधिष्टीत लोककल्याणकारी प्रजेच स्वराज्य अर्थातच प्रजासत्ताक व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी शिकवण देते ती शिकवण बौद्ध संस्काराशिवाय अन्य कोणती असू शकत नाही.अशा संस्काराचं बीज  पेरून समदं इतिहासात प्रजेचा रक्षणकर्ता घडवून भारतीय संस्कृतीच्या संस्कारात जो पर्यंत जिजाऊसंस्काराला सुवर्णअक्षराने नोंदवले जानार नाही तोपर्यंत इथला इतिहास कोराच.आज याच राजमातेच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आजच्या नीतिशून्य समाजाला भानावर आणण्यासाठी जिजाऊंच्या संस्कारांची पेरणी या समाजात होणे अपरिहार्य ठरते.काळानुसार समाजात विविध प्रकारच्या समस्या या निरंतर येत असतात.त्यावर मात करण्याची ताकत ही महापुरुषाच्या विचारातून येते.जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा संस्काराचा उल्लेख केला जाईल तेव्हा तेव्हा जिजाऊंच्या संस्काराचा उल्लेख केला जाईल.संस्काराशिवाय जिजाऊ आणि जिजाऊ शिवाय संस्कार या समीकरणाला टाळणे आता अशक्यच.राजमाता जिजाऊ यांच्या संस्काराचा विचार केला असता त्यांची शिकवण ही मानावकेंद्रित असल्याचे स्पष्ट दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा विचार केला असता त्यांची लढाई ही मानवी अधिकाराची होती.ज्या राज्यव्यवस्थेत माणसाचे ,त्याच्या अधिकाराचे हनन होत होते. ती विषमवादी दमण व्यवस्था मोडीत काढुन लोकांच राज्य निर्माण करण्याची गरज म्हणजे समतेची पायाभरणी होय.पण याच इतिहासाला खोटे ठरवत गेल्या शंभर वर्षांपासून शिवरायांचा खोटा इतिहास सांगून हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणण्याचे कटकारस्थान याच महाराष्टात चालू आहे. ज्या प्रमाणे शिवरायांचा इतिहास खोटा लिहला गेला त्याचप्रमाणे जिजाऊंच्या बाबतीतही तीच खोटी जळमटं धूपऊन बहुजन राजमाता जिजाऊंची बदनामी याच महाराष्ट्रात केली गेली यातील दुर्दव्य वेगळेच.शिवधर्म आणि बौद्ध धम्म यातील फरकाचा विचार केला असता आज सर्वसृत आणि सर्वमान्य(नवीन ऐतिहासिक संशोधनातून) स्पष्ट झाले की,शिवधर्माची स्थापना आणि त्याचा अंतिम मुक्काम हा बौद्ध धम्म आहे. जी विचारधारा मानावकेंद्रित असते त्या विचारधारेचे उद्दिष्ट सामाजिक न्याय प्रस्थापित करणेच असते.त्या अर्थाने शिवाजी महाराजांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.त्यांच्यातील मानवी संवेदना किती प्रामाणिक होती याचे उदाहरण पहायचे झाल्यास  एक घटना खूप महत्वपूर्ण ठरते .ती म्हणजे अफजलखानाचा वध केल्यावर त्याची समाधी प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी बांधली.प्रजेमध्ये प्रश्न निर्माण झाले. अफजलखान तर शत्रू होता त्याच्या समाधीचा येवढा विचार काय करायचं?त्यावर छत्रपती म्हणतात, "खान गेला माणूस गेला त्यासोबत वैरही संपला"हे अशाप्रकारची मानवी संवेदना शिवाजीराजात रुजली गेली त्यांचं सगळं श्रेय  जिजाऊंना जाते.असं म्हटलं जाते की, बालकाला घडवण्यात मातेची भूमिका महत्वपूर्ण ठरते. त्यामुळेच तर शिवरायांचे चरित्र सूर्यप्रकाशासारखे स्वछ आणि तेजस्वी होते. राजाबद्दल शत्रूंना व त्यांच्या स्त्रियांनादेखील आदर वाटायचा. राजांनी आपल्या देशबांधवांना सांगितले की",ज्याला यश पाहिजे त्यांनी स्रीअभिलाशा करू नये."  या सगळ्या गोष्टी जिजाऊंच्या संस्काराची साक्ष देतात.अशाच संस्कारामुळे  शिवाजी घडले .राजे चारित्रसंपन्न असल्यामुळे त्यांचे सर्व सहकारी सैनिक व प्रजा नीतिमान होती.  अशा नीतिमान लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेत नीतिमत्ता ठासून भरलेली दिसते.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे हे नीतिमान असल्यामुळेच या लढाया जिंकू शकले.नीती म्हणजे धम्म.यापलीकडे जाऊन जिजाऊंचा ऐतिहास व त्यातील वारसा जपणारी प्रामाणिक वारसदार पाहता पूर्वाश्रमीचे महार आणि आजचे बौद्ध यांच्यात व जिजाऊंचे नातेसंबंध रक्ताचे नाते स्पष्ट करतात.या संदर्भातील महत्वपूर्ण ऐतिहासिक संशोधन होणे अजून बाकी आहे. तथापि जिजाऊ आणि बुद्धिप्रामान्यवाद याचा विचार केला असता त्यांच्या संस्कारातून एक मोठे शोध बाहेर पडते आणि त्याचा संबंध थेट बौद्ध तत्वज्ञानाशी येऊ लागतो. जिजाऊ आणि शहाजीनी शिवा हे नाव ठेवत असताना जगाच्या व भारताच्या सर्वच उपखंडातील सांस्कृतिक इतिहास तपासला होता."शिवा" हे नाव भारतीय उपखंडातील मानवी जीवनाचा आविष्कार आहे.भारतीय उपखंडातील नागरिकांचे मूळ सूत्र मानवतावादी,स्वातंत्र्यवादी, न्यायवादी, समतावादी होते.आणि या सर्वांचा निर्माता म्हणजे शिव पुरुष होय. पुढे यालाच आदरार्थी जी लावून शिवाजी झाले.आदर्श माता जिजाऊंचा महाल पाचाडच्या महारवाड्यात आहे.शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कारविधी महारांनी महारांच्या शेतात केला. जिजाऊंचे वडील लखुजी जाधव  यांच्या वाड्यात बौद्धमुर्त्या सापडल्या.यावरून ज्याअर्थी लखुजी जाधवांचा संबंध बौद्धसंस्कृतीशी येतो त्याअर्थी ज्या  जिजाऊंचाही संबंध बौद्धसंस्काराशी येतो.तेच संस्कार छत्रपतीवर करून जिजाऊंनी  छत्रपतींच्या माध्यमातून लोककल्याणकरी स्वराज्य निर्माण केले.आणि याच लोककल्याणाचा अर्थ  बहुजन हिताय बहुजन सुखायशी येतो.१०नोव्हेंबर १६५९रोजीचा अफझलखान भेटीचा तसेच आग्रा येथील औरंगजेबाच्या भेटीचा प्रसंग म्हणजे जागतिक इतिहासातील मानसशास्त्रीय अभ्यासाचे एकमेव उदाहरण आहे.  मानसशास्त्रीय अध्ययन ,तर्क, या सगळ्या बाबी विज्ञानवादाशी जुळतात.विज्ञानवाद म्हणजेच बुद्धिप्रामान्यवाद ,मानवतावाद  बौद्धनीती होय.शिवाजी राजेंच मराठी,हिंदी,संस्कृत ,कन्नड उर्दू,तेलगू अशा भाषेवर  प्रभुत्व होतं. राजेंना  प्रत्यक्षात पाहणारे समकालीन लिहतात "राजेंच्या मुद्रेवर नेहमी हास्य असे"हस्यामुळे पहिल्या भेटीतच राजांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडत असे.कितीही रागाने राजाकडे कोणीही आले की,त्यांचा राग नाहीसा होत असे.कारण राजांचे प्रामाणिक आणि हास्य व्यक्तिमत्व शांततेचा पुरस्कार करत असे.या सगळ्या बाबतीतून राजेंच व्यक्तिमत्व घडलं त्यातील प्रत्येक घटनेत  जिजाऊंचे बौद्धसंस्कार अधोरेखित होतात. शिवरायांची बुद्धिनिष्ठा ही बुद्धांच्या बुद्धिवादाशी संबंधित आहे. प्रशासन व्यवस्था,राज्यव्यवस्था,आष्टप्रधान मंडळ संस्कृती संकल्पना बुद्धाच्या गणराज्य संकल्पनेशी निगडित आहे.जिजाऊ नागवंशिय आहेत.सिंधखेडराजाची अजून एक महत्वपूर्ण बाब अशी की, जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव.याच गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे.ते कित्येक वर्षांपासून गावचे मुळ रहिवासी आहेत.जिकडे तिकडे जाधवच जाधव.सिंधखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध(महार)आहेत.त्यात एखाद दोन अपवाद वगळता बाकी सगळे जाधव हे महारच कसे?हा संशोधनाचा प्रश्न आहे. महार आणि मराठा हे एक असून त्यांच्यातील संबंध हा तार्किक दृष्ट्या समजून घेणे महत्वाचा आहे.रायगड किल्याचे नामकरण रायनाक महारावरून किंवा महारांचा अंगरक्षक रायबा यावरून दिले असल्याची दाट शक्यता आहे. रायगड बांधून पूर्ण झाल्यावर तो उभा चढून जाण्याची पैज जिंकणार खंडू महारच होता.छत्रपती संभाजी राजेंचे भीमा नदीत फेकलेले तुकडे एकत्र करून शिवणारा तो गोविंद महारच होता.यासह विविध प्रसंगी स्वराज्याच्या लढाईत आपल्या जीचाची बाजी लावून लढणारे मावळे हे वारकरी होते.वारकऱ्यांचा संदर्भ बौद्धतत्वांशी येतो.जिजाऊंनी कधीच वास्तुशांतीला महत्व दिले नाही.विज्ञानवादी ,तर्कवादी संस्कार शिवाजी महाराजांच्या मनावर बिंबवण्यात जिजाऊंनी कुठलीच कसर सोडली नाही.आजच्या काळातील प्रसिद्ध शिवचरित्रकार ,वास्तव इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी एके ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की, आजवरच्या इतिहासात जिजाऊंनी शिवबावर रामायणातील,महाभारतातील गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्या बाबी चुकीच्या असून "शिवरायावर बुद्धाचे,तुकारामाचे विचार पेरून त्यांना समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,न्यायाची शिकवण देण्यात जिजाऊंचा पुढाकार महत्वपूर्ण आहे.अशा या संस्काराची पेरणी करून तर्कवादी,विज्ञानवादी ,दूरदृष्टीकोणवादी ,मानववादी  छत्रपती शिवाजी महाराज बनवण्यात जिजाऊंचे संस्कार महत्वपूर्ण ठरतात.आणि त्या संस्कारात बौद्धतत्वनिष्ठतेचा जवळजवळचा संबंध आहे. अशा या महान बुद्धिप्रामाण्यवादी जिजाऊंना आजच्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्रिवार वंदन। हे राज्य,राष्ट्र जिजाऊंच्या संस्काराने प्रगल्भ ठरून आजच्या मानवी समस्या आणि समाजातील लोप होणारी नीतिमान शासनव्यवस्था यावर पुन्हा एकदा जिजाऊंच्या संस्काराची बीजप्रेरणी होणे आवश्यकच नाहीतर ती एक अपरिहार्य नड आहे.मात्र याच गरजेला फाटा देत ब.मो.पुरंदरेसारखे उचापतीखोर उठून माँसाहेब जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असताना हा बहुजन,विज्ञानवादी विशेषतः मराठा बांधव आपल्या लेखन वाचन संस्कृतीच्या अपुऱ्या कार्याने दूर असल्याच्या कारणाने हे होतय याचा प्रत्यय येऊ लागतो.म्हणून आज आपणास किमान एवढंतरी जागृत राहावे लागणार आहे की कोणी आपल्या आईच्या तळपायावर करडी नजर ठेवणार नाही. अन्यथा आमच्या बौद्धिक दिवळखोरीला ही व्यवस्था पुन्हा पुन्हा गुलाम करून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि त्या वारसांना धुळीस लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण ज्या समाजाच्या अस्मितेवर जर कोणी शिंतोडे उडवत असेल आणि तो समाज जर मूग गिळून बसला असेल तर हे त्या समूहाच्या गुलामीचे  संकेत आहेत. अशी गुलामशाही नष्ट करण्यासाठीच जिजाऊंनी शिवाजीच्या हातात संस्काराची तलवार दिली त्यातून उभारलेलं स्वराज्य म्हणजे जिजाऊ संस्कार आणि या संस्काराची नाळ थेट तथागताशी जुळते! वंदन जिजाऊंना।वंदन जिजाऊंना।


--मनोहर सोनकांबळे


मफिल संशोधक विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

८८०६०२५१५०

manoharsonkamble 255@gmail.com

1 comment:

  1. सिंधखेडराजाचे बहुतांश जाधव हे मराठा नसून बौद्ध(महार)आहेत.याचा संदर्भ देणे

    ReplyDelete

Pages