BRSPच्या कार्यकर्त्यांचा आजाद समाज पार्टी मध्ये प्रवेश. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 11 January 2021

BRSPच्या कार्यकर्त्यांचा आजाद समाज पार्टी मध्ये प्रवेश.

  रायगड    :      कर्जत तालुक्यातील बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टी (BRSP )च्या कार्यकर्त्यांनी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी मध्ये प्रवेश केला आहे,पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असल्याने हा पक्ष प्रवेश करीत असल्याचे रायगड जिल्ह्याचे BRSP चे महाराष्ट्र प्रदेश सचिव व रायगड जिल्हा अध्यक्ष ऍड. सुमित साबळे यांनी ही माहिती दिली आहे.

            आजवर कर्जत तालुक्यात BRSP वाढवण्यात आम्ही कार्यकर्त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. तालुक्यात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला, याच्यासाठी आंदोलन करून, संविधान हक्क परिषद, CAA NRC आंदोलन, भीमा कोरेगाव आंदोलन, तसेच अनेक मूलभूत बाबीसाठी नेहमी अग्रेसर राहून आंदोलन केली व BRSP पक्ष वाढीस आणला तसेच नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच निवडून आणले.या सर्व गोष्टी घडत असताना पक्ष्याच्या काही मंडळलीकडून सहकार्य लाभत नसल्याने पक्षावर नाराज होत आजाद समाज पार्टीचे (ASP)महाराष्ट्र अध्यक्ष राहुल प्रधान  यांच्या उपस्थितीत नेरळ येथील सम्राटनगर येथे हा जाहीर प्रवेश करण्यात आला आहे..

   यावेळी BRSP चे जिल्हा प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते कर्जत-खालापूर तालुका महासचिव ताहीर जलगावकर,,तालुका उपाधक्ष्य तोसिफ मुल्ला यांसह कोदिवडे, किरवली ग्रामपंचायत चे उपसरपंच,सदस्यसह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आजाद समाज पार्टी व भीम आर्मी मध्ये प्रवेश केला आहे

No comments:

Post a Comment

Pages