वर्धा येथे पत्रकारदिनी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा पञकार संरक्षण समिती वतीने गौरव.! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 6 January 2021

वर्धा येथे पत्रकारदिनी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारीता करणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा पञकार संरक्षण समिती वतीने गौरव.!

वर्धा (प्रतिनिधी)आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय वर्धा येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते.  यावेळी  सावंगी रूग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ.अभ्युदय मेघे, जिल्हा परिषद चे अध्यक्ष  सौ.सरिताताई गाखरे, उपाध्यक्ष सौ. वैशालीताई येरावार,  लोकसत्ता चे प्रशांत देशमुख हितवाद चे नरेंद्र देशमुख  पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे , डाॅ. संघपाल उमरे, जिल्हा अध्यक्ष रविराज  घुमे, सचिव योगेश कांबळे, कार्याध्यक्ष शेख सत्तार ,संघटक दिलीप पिपंळे मंचकावर उपस्थित होते. 

या वेळी ग्रामिण भागात उत्कृष्ट पत्रकारी करीत तळागळातील समस्यांना वाच्या फोडणाऱ्या पत्रकार व सदैव समाजासाठी धडपड करणाऱ्या समाजसेवकांना गौरविण्यात आले. यामध्ये सेवाग्राम रूगणालयाचे अधिष्ठाता डाॅ. नितिन गगणे. सामान्य रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. संजय दाढे,  व कोरोणा योद्धा जनार्दन भगत, बंडू शेंडे, यांच्या सह धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले रामदास पवार, सौ.अर्चनाताई भोबंले देशमुख  सोबतच आपल्या लेखनातून  ग्रामिण भागातील समस्यांना वाचा फोडण्यारे प्रतिनिधी सुहास धानोकर, प्रफुल लुंगे, प्रभाकर कोळसे ,प्रफुल कुडे, राहुल गजरे, संजय देसाई वृत्तपञ संगणक मंगेश कातकर, वृत्तपञ विक्रेता यशवंत ठाकरे  यांचासह पत्रकार व समाजसेवकांना खासदार रामदास तडस यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह व सन्मान पञ  देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी खासदार रामदास तडस  उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकार हा चौथा स्तंभ असुन तो आपल्या लेखनातून, कॅमेरातून दिवस रात्र उन पाऊस थंडी याची तमा न बाळगता सत्त समाजासाठी स्वताला झोकून टाकणारा एकमेव प्राणी आहे. या संपूर्ण कार्यक्रमा येशस्विरीत्या पारपाडण्या करीता   विनोद महाजन रवि साखरे , मोहन सुकार , प्रकाश झाझंडे , राजू बाळापुरे , गणेश शेंडे सह पत्रकार संरक्षण समितीच्या सदस्यांनी परीश्रेम घेतले. संचालन नारायण जारूंडे तर आभार मोहन सुरकार यानी मानले.



No comments:

Post a Comment

Pages